सन २०१९ ची सुरुवात झालीय ती #10YearsChallange ने. म्हणजे आपले १० वर्षांपूर्वीचे आणि आत्ताचे फोटो सोशल मिडियावर शेअर कण्याचा हा ट्रेण्ड नेटकऱ्यांनी चांगलाच डोक्यावर घेतला. बरं यामध्ये अनेक राजकीय पक्ष, ब्रॅण्ड्स, कंपन्यांबरोबरच पर्यावरणवादी संस्थांनीही उडी घेत वेगळ्या पद्धतीने हे चॅलेंज स्वीकारले आहे. पण असाच दहा वर्षांपासून आत्तापर्यंतच्या प्रवासाचा विचार केल्यास सर्वाधिक बदलेली गोष्ट म्हणजे जेथे हे चॅलेंज व्हायरल झाले आहे ते माध्यम म्हणजेच इंटरनेट.

२००८ ते २०१८ या दहा वर्षात इंटरनेटने सर्व काही बदलून टाकेल आहे. आपल्या सवयी, आपली संवाद माध्यमे, आपले रहाणीमान, आपला प्रवास, आपल्या सवयी असं सगळं काही या इंटरनेटमुळे बदललं आहे. अशी एकही गोष्ट सध्या आपल्या आयुष्यात नाही ज्यावर इंटरनेटचा प्रभाव नाही. आज या नेटशीवाय आपलं पानही हलत नाही असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. पण दहा वर्षांपूर्वी अशी स्थिती नव्हती भारतामध्येही तेव्हा इंटरनेट एवढं माणसाळलेलं नव्हतं. म्हणजे नेटचा उपयोग मोजक्या लोकांकडून केला जायचा. आजच्या भाषेत सांगायचं तर ते ‘एफोर्डेबल’ नव्हतं तितकं. पण तेव्हा इंटरनेट नक्की होतं तरी कसं आणि आत्ता ते कसं आहे यावर टाकलेली ही नजर…

>
२००८ साली भारतात इंटरनेट वपारणाऱ्यांची संख्या – ५ कोटी २४ लाख ३१ हजार
२०१८ साली भारतात इंटरनेट वपारणाऱ्यांची संख्या – ५६ कोटींहून अधिक
>
२००८ साली भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची टक्केवारी – ४.४ टक्के
२०१८ साली भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची टक्केवारी – ४२.८७ टक्के
>
२००९ पर्यंत एकूण इंटरनेट वापरणाऱ्यांपैकी ३७ टक्के युझर्स हे सायबर कॅफेमधून इंटरनेट वापरायचे. ३० टक्के ऑफिसमधून तर २३ टक्के घरांमध्ये इंटरनेटची सुविधा होती.
>
२००९ नंतरच मोबाइल इंटरनेटचा प्रभाव वाढू लागला. २००९ ते २०१० सप्टेंबर या कालावधीमध्ये इंटरनेट मोबाइलवर वापरणाऱ्यांची संख्या २७.४ कोटी इतकी होती. पण ही सेवा केवळ टू-जीची होती.

>
आज मोबाईलवरून इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ४७.८ कोटींहून अधिक आहे. त्यापैकी २९.१ कोटीहून अधिक शहरी भागातील आहेत तर १८.७ कोटींहून अधिक युझर्स हे ग्रामीण भागामधील आहेत.
>
आज जगभरात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या २२७ कोटी इतकी आहे. हाच आकडा २००८ साली केवळ १४.५ कोटी इतका होता.
>
२००८ साली जगभरातील केवळ ६० लाख लोकं ट्विटर वापरत होते. आज हाच आकडा ६ कोटी ७० लाखांहून अधिक आहे.
>
दहा वर्षापूर्वी म्हणजेच २००८ साली व्हॉट्सअप (स्थापना २००९), इन्स्टाग्राम (स्थापना २०१०), स्नॅपचॅट (स्थापना २०११) ही लोकप्रिय माध्यमे अस्तित्वातच नव्हती.
>
२००८ साली प्रत्येक मिनिटाला १५ तासांचे व्हिडीओ युट्यूबवर अपलोड केले जायचे आज दर मिनिटाला ३०० तासांचे फुटेज असणारे व्हिडीओ युट्यूबवर अपलोड होतात.
>
२००८-२००९ साली युट्यूबवर युझर्स सरासरी १५ मिनिटांपर्यंत वेळ घालवायचे आज केवळ मोबाइलच्या माध्यमातून युट्यूबवर युझर्स दिवसातील ४० मिनिटांचा वेळ घालवतात.
>
२००८ साली गुगल क्रोम ब्राऊजर लॉन्च करण्यात आला.
>
टी मोबाइल या कंपनीचा जी वन हा मोबाइल २००८ साली लॉन्च करण्यात आला. अॅण्ड्राइडवर चालणार हा जगातील पहिला मोबाइल होता.
>
आज जगातील ६२.४ टक्के लोक इंटरनेटवर सर्फिंग करण्यासाठी गुगल क्रोम वापरतात.
>
आज एकूण स्मार्टफोन बाजापेठेतील ७५ टक्केहून अधिक वाटा हा अॅण्ड्राइड फोनचा आहे.
>
आज जगभरामध्ये अॅण्ड्राइड फोन वापरणाऱ्यांची संख्या २०० कोटींहून अधिक आहे.
>
अॅण्ड्राइड गुगल प्लेवर आज ३३ लाख अप्लिकेशन्स उपलब्ध आहेत.
>
२००८ साली जगभरात पाठवण्यात आलेले इमेल्स – १३० कोटी
२०१८ साली जगभरात एका मिनिटांमध्ये पाठवण्यात येणारे इमेल्स – १८ हजार ७०० कोटी
>
२००८ साली अस्तित्वात असणाऱ्या वेबसाईट्स – १८ कोटी ६७ लाख २७ हजारहून अधिक
२०१७ साली अस्तित्वात असणाऱ्या वेबसाईट्स – १७६ कोटी ६९ लाख २६ हजारहून अधिक
>
२००८ साली अस्तित्वात असणाऱ्या ब्लॉग्सची संख्या – १३ कोटी ३० लाख
२०१८ साली अस्तित्वात असणाऱ्या ब्लॉग्सची संख्या – ५० कोटी ५० लाख

 

फोटो सौजन्य: व्हिज्यूअल कॅपिटलिस्ट डॉट कॉम

 

आता ही सगळी आकडेवारी पाहून आपण इतकच म्हणून शकतो की आपण मागील दहा वर्षांमध्ये इंटरनेटचा अती जास्त वापर करत आहोत. दिवसोंदिवस हा वापर वाढतच जाणार असून ज्या पद्धतीने तंत्रज्ञान बदलत आहेत त्यानुसार हा वापर आणखीन अनेक पटींने वाढणार आहे. इंटरनेटने खऱ्या अर्थाने जग जोडले गेले आहे. जग अधिक जवळ आले आहे. इंटरनेटमुळे जागातील कोणत्याही कोपऱ्यामधील आपल्या प्रिय व्यक्तीशी आपण कायम कनेक्टेड असल्याची भावाना सुखावणारी आहे.

Story img Loader