Bird Flu Risk Rising 100 Times Worse Than COVID: मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडयात नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील मृत कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू आजाराचा एच ५ एन १ हा विषाणू आढळला होता. तर आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याच बर्ड फ्लूचा धोका जगभरातील तज्ज्ञांनी अधोरेखित केला आहे. यूके-आधारित टॅब्लॉइड डेली मेलने दिलेल्या अहवालानुसार, “कोविड १९ च्या साथीच्या आजारापेक्षा १०० पट वाईट परिस्थिती निर्माण करण्याची आणि मृत्यू दर वाढवण्याची ताकद बर्ड फ्लूमध्ये असू शकते.”

तज्ज्ञांच्या हवाल्याने दिलेल्या अहवालात नवीन साथीच्या आजाराच्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. संशोधकांनी बर्ड फ्लूच्या H5N1 स्ट्रेनवर चर्चा करून हा विषाणू प्रचंड वेगाने पसरत असल्याचे म्हटले होते, तसेच या विषाणूमध्ये जागतिक महामारी निर्माण करण्याची क्षमता आहे, असेही शास्त्रज्ञांनी सांगितले.

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Redevelopment , Developers Committee, Old Thane ,
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासासाठी विकासकांची समिती
makar sankranti birds emotional video
“पतंग नवीन खरेदी कराल; पण त्यांच्या जीवाचं काय?” मकर संक्रांतीचा ‘हा’ आनंद कोणाला तरी कायमचं दुख देऊन जातोय; पाहा हृदयद्रावक video
Makar Sankranti motorcyclist died after nylon manja got stuck in his neck
नाशिकमध्ये नायलाॅन मांजामुळे युवकाचा मृत्यू
gang-rape_
Kerala Horror : पाच वर्षांत ६४ जणांकडून लैंगिक अत्याचार, केरळमध्ये क्रौर्याची परिसीमा; व्हिडिओही केले होते व्हायरल!
Loksatta explained Is the risk of HMPV increasing
विश्लेषण: ‘एचएमपीव्ही’चा धोका वाढतोय?
rabit fever
माणसांमध्ये वेगाने पसरतोय ‘रॅबिट फिव्हर’; काय आहे हा विचित्र आजार? त्याची लक्षणे काय?

“बर्ड फ्लूचा विषाणू उड्या मारतोय”, काय म्हणाले संशोधक?

पिट्सबर्गमधील प्रख्यात बर्ड फ्लू संशोधक डॉ सुरेश कुचीपुडी यांनी ब्रीफिंग दरम्यान सांगितले की, “मानवांसह सस्तन प्राण्यांमध्ये सुद्धा या विषाणूचे संक्रमण होऊ शकते. याच क्षमतेमुळे H5N1 फ्लू हा साथीचा रोग होऊ शकतो. आताच अस्तित्वात आलेल्या एखाद्या व्हायरसविषयी ही चर्चा नाही, हा विषाणू अगोदरच अस्तित्वात आहे आणि वेगाने पसरत सुद्धा आहे. आपल्याला त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे.”

फार्मास्युटिकल कंपनीचे सल्लागार, जॉन फुल्टन यांनी नमूद केले की, “संभाव्य H5N1 साथीचा रोग अत्यंत गंभीर असू शकतो, तो कोविड-19 साथीच्या आजारापेक्षा कितीतरी जास्त पटीने घातक ठरू शकतो. हे कोविडपेक्षा १०० पट वाईट आहे. या आजाराने येत्या काळात उच्च मृत्यू दर कायम ठेवल्यास व मानवामध्ये याचे संक्रमण परावर्तित होऊ लागल्यास ही गंभीर स्थिती उद्भवू शकते. त्यानंतर आपण फक्त मृत्यू दर कमी होईल अशी आशाच करू शकते.”

बर्ड फ्लूमुळे आजवर किती मृत्यूंची नोंद?

जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) डेटा सुद्धा हेच दर्शवतो की २००३ पासून H5N1 विषाणूची लागण झालेल्या प्रत्येकी १०० पैकी ५२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यावरून हे लक्षात येते की, या विषाणूमुळे मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. दरम्यान, सध्याचा कोविड मृत्यू दर ०.१ टक्के आहे, जो साथीच्या रोगाच्या पहिल्या टप्यावरून २० टक्के कमी झाला आहे. आजवर डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार बर्ड फ्लूच्या एकूण ८८७ प्रकरणांपैकी ४६२ मृत्यूची नोंद झाली आहे.

हे ही वाचा<< ६० टक्के कार्यरत किडनीसह IPL खेळतोय RCB चा ‘हा’ स्टार खेळाडू; किडनीच्या सुदृढतेसाठी काय खावं, काय नाही?

दरम्यान, सध्याचा अहवाल सुद्धा मिशिगनमधील कुक्कुटपालन व्यवसायात आणि टेक्सासमधील अंडी उत्पादक कोंबड्यांमध्ये, एव्हीयन फ्लूचा उद्रेक झाल्याची नोंद झाल्यानंतर समोर आला होता. याशिवाय, दुग्धशाळेतील गायींना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचेही अहवाल समोर आले आहेत. सस्तन प्राण्यांपासून माणसाला विषाणूची लागण झाल्याचे पहिले प्रकरण सुद्धा अलीकडेच समोर आले होते.

Story img Loader