भाषा हे माणसाच्या संस्कृतीचे मोठे प्रतीक. भाषेमुळे माणसाचा बौद्धिक विकास होतो, माणूस भाषा कशी शिकतो, तिच्यातील फरक कसा ओळखतो यावर गेली अनेक वर्षे संशोधन सुरू आहे. साधारण तेरा महिन्यांचे मूल भाषेतील फरक ओळखू शकते, असे नवीन संशोधनात सिद्ध झाले आहे. ऑस्ट्रेलियातील ऑकलंड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, वयाच्या अवघ्या तेराव्या महिन्यापासूनच मूल वेगवेगळ्या जमातीच्या लोकांच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये फरक आहे हे ओळखते. एकाच शब्दाला या भाषांमध्ये वेगवेगळे शब्द आहेत एवढे कळण्याइतके भाषिक कौशल्य या लहान बाळांना असते हे ऐकून जरा धक्काच बसेल, पण ते खरे आहे. लोकांनी वापरलेल्या शब्दांचे सामान्यीकरण ही मुले करीत नाहीत, असे भाषा संशोधक डॉ. अ‍ॅनेट हेंडरसन यांचे म्हणणे आहे. मुले त्यांच्या समुदायात बोलले जाणारे शब्दही इतक्या लहान वयात शिकत असतात, पण त्याच बरोबर एकाच वस्तूला दुसऱ्या समाजातील लोक कुठला शब्द वापरतात हे त्यांना समजते. ऑकलंड येथील इंग्रजी भाषक कुटुंबातील मुलांना चित्रपटातील दोन अभिनेत्यांच्या चित्रफिती दाखवण्यात आल्या त्यात एक जण फ्रेंच भाषेतील लोकप्रिय असलेले बडबडगीत गात होता, तर दुसरा इंग्रजी भाषेतील बालगीत गात होता. मुलांना फ्रेंच भाषेतील व्हिडीओ पुन:पुन्हा दाखवण्यात आली तेव्हा त्यांना ती व्यक्ती या मुलांनी पूर्वी न पाहिलेली वस्तू उचलते व त्याला मेडो असे संबोधते हे लक्षात आले. आणखी एका चाचणीत या मुलांनी तोच फ्रेंच वक्ता तीच वस्तू मेडो या नावाने उचलतो, तर दुसऱ्यात तो ती वस्तू मेडो असे नाव नसतानाही उचलतो. नाव नसलेल्या त्या वस्तूला नंतर ती व्यक्ती मेडो म्हणते तेव्हा ही मुले प्रदीर्घ काळ त्या फ्रेंच व्यक्तीचे निरीक्षण करताना दिसली. याचा अर्थ या मुलांनी त्यांची भाषा शिकण्यासाठी जे नियम वापरले, तेच त्या फ्रेंच व्यक्तीचे निरीक्षण करताना लावले. नंतर या मुलांना एक इंग्रजी व्यक्ती फ्रेंच व्यक्तींना दाखवलेल्या वस्तूंना एकच नाव वापरताना दिसते, तेव्हा या मुलांना या वस्तूंकडे पाहताना त्यात फारसा फरक वाटत नाही, यावरून दोन्ही भाषेतील व्यक्तींनी त्या वस्तूला त्यांच्या भाषेत असलेल्या शब्दाचे आदानप्रदान केले नाही असे लक्षात आले. त्यामुळे या मुलांना भाषेचे पारंपरिक स्वरूप समजण्यात अडचणी आल्या, डेव्हलपमेंट सायकॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
राजेंद्र येवलेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा