काला घोडा आर्ट फेस्टिव्हल (केजीएएफ) हा भारतातील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल यंदा विसाव्या वर्षांत पदार्पण करत आहे. केजीएएफ २०१९ कला आणि संस्कृतीची तब्बल दोन दशकं साजरी करत आहे. २ ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधीत काळा घोडा फेस्टिवल डिझाइन, सिनेमा, नाटक, नृत्य, साहित्य आणि अनेक विविध प्रकारांतून फेस्टिव्हल साजरा करण्यात येणार आहे. या वर्षी महात्मा गांधीजींची १५०वी जयंती आहे. गांधीजींनी देशासाठी जे योगदान दिलं आणि त्यांनी जे तत्त्वज्ञान मांडलं त्याला या फेस्टिव्हलमधून मानवंदना देण्यात येणार आहे.
या फेस्टिव्हलमध्ये विविध प्रभाग, सामाजिक आणि आर्थिक स्तरांतून अनेक गोष्टींचा समावेश असतो, अनेक नवीन माहिती पुरवली जाते, करमणूक केली जाते, तेही निःशुल्क. कलाकार, कारागीर, प्रमुख आणि स्वयंसेवक अशा सर्वांच्या मेहनतीने फेस्टिव्हलमध्ये संस्कृतीचा आनंदोत्सव साजरा होतो.
तब्बल वीस वर्षांचा पल्ला गाठणाऱ्या फेस्टिव्हलबद्दल केजीएएफचे कोऑर्डिनेटर निकोल मुडी म्हणाले, ‘सृजनशीलतेचे माहेरघर ठरलेल्या काळा घोडा फेस्टिव्हलचे हे विसावे वर्ष आहे. व्हिज्युअल आणि परफॉर्मिंग आर्ट इंडस्ट्रीमध्ये गुंतलेल्या अनेक मान्यवरांनी या फेस्टिव्हलला पसंती दिलेली आहे. या वर्षी येत्या भविष्यकाळातील घडणारे विकास दर्शवताना आम्ही नॉस्टेल्जियाचा आधार घेतलेला आहे, प्रत्येक प्रकारात याचा समावेश असेल.’
काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलच्या विसाव्या वर्धापनदिनानिमित्त काय काय गोष्टी येथे पाहायला मिळतील, ते जाणून घेऊयात..
कलिनरी डिलाइट्स: फेस्टिव्हलमध्ये भारतीय पेस्ट्री शेफ पूजा धिंग्रा त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करतील. पूजा यांच्याबरोबर अमेरिकन शेफ टिफनी डेरी उपस्थितांसाठी कलिनरी कार्यशाळा घेतील.
डॉक्युमेंट्री स्क्रीनिंग: फेस्टिव्हलमध्ये ख्यातनाम दिग्दर्शक खालिद मोहम्मद शहरातील इराणी कॅफे यावर खास डॉक्युमेंट्री सादर करतील.
द मॅजिक ऑफ फ्लूट: जागतिक कीर्तीचे बासरीवादक पद्मविभूषण विजेते पंडित हरिप्रसाद चौरासिया क्रॉस मैदानातील स्टेजवर उपस्थित असतील.
म्युझिकल नोट्स: फेस्टिव्हलमध्ये प्रकृती आणि सुकीर्ती कक्कर आपल्या कलाविष्काराने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील.
अ ट्रीट फॉर द मूव्ही इन्थुझिअॅसिस्ट: `तुंबाड’ आणि `बधाई हो’ सिनेमाच्या कास्ट आणि टीमबरोबर विशेष संवाद साधण्याची संधी. या संवादामुळे लोकांपर्यंत सिनेमाचे वेगवेगळे दृष्टिकोन मांडले जाणार.
द एव्हरग्रीन शान: शानच्या तनहा दिल या गाण्यालाही २०१९ मध्ये वीस वर्षं पूर्ण होत आहेत. या फेस्टिव्हलमध्ये गायक शान हे गाणं गातीलच, शिवाय त्यांची नवी आणि जुनी गाणीही सादर करतील.
द नॅशनल हिरोज: साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून २६/११ चा हल्ला आणि त्यातील वाचलेले लोक या विषयावर पॅनेल चर्चा आय़ोजित
गेट सेट ड्रोन: गौरव सिंग प्रात्यक्षिक आणि डीआयवाय सत्र/कार्यशाळेचे आयोजन करतील, `गेट सेट ड्रोन’ या नावाची की धमाल कार्यशाळा असेल.
खूप सारे स्टॉल्स आणि खूप खरेदीही: फेस्टिव्हलच्या विसाव्या वर्षांत पाच दिवसांनंतर स्टॉल्सवर नवनवीन उत्पादने सादर केली जातील. लोकांना येथे भरपूर उत्पादने पाहायला मिळणार आहेत, शिवाय दर दिवशी प्रत्येक स्टॉलवर नवनवीन गोष्टींचा अनुभव घेता येणार आहे.
फॉर द थिएटर लव्हर्स: नाटकक्षेत्रातील दिग्गज सुचित्रा कृष्णमूर्थी फेस्टिव्हलमध्ये खास नाटकातील प्रवेश सादर करतील.
साहित्य: पुरस्कार प्राप्त लेखिका गिथा हरिहरन त्यांचे हॅव बिकम द टाइड या पुस्तकाबद्दल आणि लेखिका म्हणून त्यांच्या प्रवासाबद्दल बोलतील. त्यांच्या कादंबरीच्या संहितेतून सामाजिक कमजोरीबाबत त्या रणजीत होस्कोटे यांच्याबरोबर विविध अंगांनी चर्चा करतील.
टच अ कॉर्ड: व्हायोलिनवादक सुनिता भुयन यांचा कलाविष्कार अनुभवता येईल, त्या ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्या आहेत, वंचित मुलांसाठी त्यांनी केलेल्या कामाचा व्हॅटिकनतर्फे गौरव करण्यात आला आहे.
पीपल कॉल्ड काला घोडा: काळा घोडा असोसिएशनतर्फे द पीपल प्लेस प्रोजेक्टसह पुस्तकाचे प्रकाशन करतील, यात दोन दशकांपासून सुरू असलेल्या या फेस्टिव्हलबाबत लोकांची मते, लोकांची संलग्नितता आदी अनुभवांचा समावेश असेल; हे पुस्तक म्हणजे फेस्टिव्हलचा वीस वर्षांचा इतिहास आहे आणि सांस्कृतिक लेखाजोखा.
हिट द डान्स फ्लोर: सुनयना हजारीलाल (पद्मश्री), मानसी साळवे, रुक्मिणी आणि शक्ती मोहन आदी कलाकार प्रेक्षकांसाठी दमदार नृत्य सादर करतील.
डान्स इट आउट: विविध प्रकारांतील (पाश्चिमात्य ते भारतीय शास्त्रीय नृत्य यांचे फ्युजन) २० नृत्याविष्कार फेस्टिव्हलमध्ये सादर करण्यात येतील.
फ्रॉम द एक्सपर्ट्स कॉर्नर: माननीय न्यायमूर्ती डॉ. डीवाय चंद्रचूड फेस्टिव्हलमध्ये भारतीय संविधानाच्या समाज, कला, इतिहास आणि संस्कृती आदींच्या सुरक्षिततेच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकतील.
हेरिटेज वॉक: या वॉकमधून शहरातील प्रमुख ठिकाणे दाखवली जातील, वीस वर्षांपूर्वी ती कशी होती आणि आजच्या घडीला ती कशी आहेत, हे दाखवले जाईल. या वॉकमध्ये २० थांबे असतील, प्रत्येक थांब्यात त्या ठिकाणाचे महत्त्व अधोरेखित केले जाईल.
महात्मा गांधीजींची १५० वर्षं: राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची ही १५०वी जयंती आहे, फेस्टिव्हलमधून या वर्षी महात्मा गांधीजींना कला आणि उपक्रमांतून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
विमेन टॉक: प्रादेशिक भाषेतील साहित्याचे विविध घटक आणि बारकावे याविषयी मराठी लेखिकांचे पॅनेल चर्चा करेल.
टू डिकेड्स ऑफ मूव्हीज: या वर्षी फेस्टिव्हलमध्ये खास स्क्रिनिंग करण्यात येत आहे. याचे वैशिष्ट्यं असे की, याच वर्षी वीस वर्षं पूर्ण करत असलेले हे सिनेमे असतील.
फेस्टिव्हलमध्ये आर्ट गॅलऱ्यांपर्यंत मर्यादित असलेली कला सर्वांसमोर आणली जाते आणि त्यावर परिणामात्मक चर्चा घडवून आणली जाते. २ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधीत या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. अंतिम वेळापत्रक जाणून घेण्यासाठी http://www.kalaghodaassociation.com येथे लॉग ऑन करा.