Maruti Suzuki कंपनीने आज (दि.१४) आपली WagonR ही कार BS6 S-CNG व्हर्जनमध्ये लाँच केली आहे. WagonR BS6 S-CNG व्हेरिअंटची किंमत 5.32 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली असून हे मॉडेल केवळ LXI ट्रिम प्रकारातच लाँच करण्यात आले आहे.
S-CNG टेक्नॉलॉजीवर आधारित असलेली ही कंपनीची तिसरी कार आहे. यापूर्वी कंपनीने Alto 800 आणि Ertiga MPV या गाड्या CNG सह लाँच केल्या आहेत. WagonR BS6 S-CNG ही कार मारुतीच्या ‘मिशन ग्रीन मिलियन’ अभियानाचा भाग आहे, या मिशनची घोषणा ऑटो एक्स्पो 2020 मध्ये करण्यात आली होती.
आणखी वाचा – (स्टॉक संपवण्यासाठी TATA च्या गाड्यांवर ‘बंपर’ डिस्काउंट)
आणखी वाचा – (मारुतीची ‘रावडी’ SUV! पहिली झलक दिसताच चर्चांना उधाण)
आणखी वाचा -(देशातील 10 सर्वाधिक Popular Cars , ‘ही’ ठरली बेस्ट ; बघा संपूर्ण यादी)
आणखी वाचा – (Kia ची जबरदस्त ‘क्रेझ’, Seltos ठरली एक नंबर SUV)
आणखी वाचा -(Mahindra चा जलवा! सिंगल चार्जमध्ये तब्बल 520 Km धावणार , 5 सेकंदात 100 चा स्पीड)
WagonR BS6 S-CNG या कारमध्ये 1.0 लीटर, थ्री-सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 58bhp ची ऊर्जा CNG मध्ये आणि 81bhp ऊर्जा पेट्रोल मोडमध्ये निर्माण करते. तर, CNG मोडमध्ये 78Nm टॉर्क आणि 113Nm टॉर्क पेट्रोल मॉडेलमध्ये निर्माण होते. कारच्या S-CNG व्हर्जनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय आहे. कारमध्ये इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स (ECUs) आणि इंटेलिजंट इंजेक्शन सिस्टिमसारखे फीचर्स आहेत.