२०२१ फोर्स गुरखा एसयूव्ही सणासुदीच्या आसपास सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.कार निर्मात्याने जारी केलेल्या नवीन टीझर प्रतिमेनुसार, २०२१ गुरखा एसयूव्ही स्नॉर्कल आणि फंक्शनल रूफ कॅरियरसह येईल. ही दोन्ही वैशिष्ट्ये गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शित झालेल्या प्री-प्रॉडक्शन गुरखा एसयूव्हीमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती.२०२१ फोर्स गुरखा एसयूव्ही महिंद्रा थारला टक्कर देईल. २०२१ गुरखा एसयूव्हीची किंमत १० लाख ते १२ लाख (एक्स-शोरूम) पर्यंत असेल असं सांगण्यात येत आहे. ऑफ-रोड सेगमेंटमध्ये महिंद्रा थारची एकमेव प्रतिस्पर्धी असेल.
२०२१ फोर्स गुरखा तीन-दरवाजे आणि पाच-दरवाजाच्या आवृत्त्यांमध्ये सादर होण्याची शक्यता आहे. गाडी चार आसनी आणि सहा आसनी अशा दोन्ही प्रकारात येणे अपेक्षित आहे. नवीन गुरखा डिझाईनच्या बाबतीत त्याच्या पूर्ववर्तीपेक्षा वेगळे असेल, ज्याला समकालीन जीवनशैली वाहनासारखे (contemporary lifestyle vehicle) दिसण्यासाठी लक्षणीय स्वरूप देण्यात आले आहे.
कशी असेल डिझाईन?
डिझाइन अपग्रेडमध्ये एलईडी डीआरएलसह नवीन हेडलाइट्सचा संच, पुन्हा डिझाइन केलेले ग्रिल आणि फ्रंट बम्पर, फ्रंट फेंडर्सवर ठेवलेले टर्न इंडिकेटर्स, पुन्हा डिझाइन केलेले टेललाइट्स, नवीन डिझाइन केलेले व्हील आणि टेलगेट-माऊंटेड स्पेअर व्हील यांचा समावेश असेल. आतील बाजूस, नवीन जनरेशन फोर्स गुरखामध्ये काळ्या रंगाची थीम मिळेल ज्यात हार्ड प्लास्टिकसारखे घटक असतील जेणेकरून ते घाण आणि पाण्याला अधिक प्रतिरोधक बनतील अशी अपेक्षा आहे. एसयूव्हीला दुसऱ्या लाईनच्या सीटमध्ये कॅप्टन सीट आणि मागील बाजूस जंप सीट असू शकते. एक नवीन टचस्क्रीन प्रणाली आणि तीन-स्पोक स्टीयरिंग व्हील असेल.
फोर्स मोटर्स २०२१ गुरखा २.६ लीटर डिझेल इंजिनसह ५-स्पीड गिअरबॉक्ससह ऑफर करण्याची शक्यता आहे. इंजिनमध्ये ८९ बीएचपीचे जास्तीत जास्त उत्पादन आणि २६० एनएम पीक टॉर्क निर्माण करण्याची क्षमता आहे. गुरखाच्या इंजिन पॉवरच्या तुलनेत नवीन महिंद्र थार अधिक शक्तिशाली दिसते. त्याच्या हुडखाली २.२ लीटर डिझेल इंजिन , २०२० थार १३० एचपी पॉवर आणि ३०० एनएम पीक टॉर्क करण्यास सक्षम आहे.