सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी एक असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राच्या XUV700 SUV ला एका तासापेक्षा कमी वेळात २५,००० बुकिंग मिळाले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, बुकिंगची ही आकडेवारी देशातील वाहन उद्योगात यापूर्वी क्वचितच पाहिली गेली आहे. महिंद्रा एक्सयूव्ही ७०० ला सुरुवातीच्या किंमतींसह सादर करण्यात आले. कंपनीने म्हटले होते की या किंमती केवळ सुरुवातीच्या २५,००० बुकिंगसाठी उपलब्ध असतील.एंट्री व्हेरिएंटसाठी नवीन एक्सयूव्ही ७०० ची किंमत बदलून १२.४९ लाख रुपये करण्यात आली आहे. बेस व्हेरिएंटच्या किंमतीत ५०,००० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा ने मंगळवारी आपल्या प्रीमियम स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) महिंद्रा एक्सयूव्ही ७०० च्या दोन नवीन एडीशन बाजारात आणण्याची घोषणा केली जी डिझेल इंजिनसह मॅन्युअल आणि स्वयंचलित दोन्ही ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध असेल. एम अँड एम लिमिटेडने एका प्रकाशनात म्हटले आहे की, दोन नवीन ७ -सीटर आवृत्त्या – AX7 लक्झरी – MT आणि AX7 लक्झरी – AT + AWD (ऑल -व्हील ड्राइव्ह) ची किंमत अनुक्रमे १९.९९ लाख आणि २२.८९ लाख रुपये आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती दिली आहे.
‘दि ग्रेट होंडा फेस्ट’ सणासुदीच्या काळात कंपनीकडून मोठ्या ऑफर्स; ५३,५०० रुपयांपर्यंत सवलत
ही आहेत फीचर्स
AX7 व्हेरिएंट एक पर्याय लक्झरी पॅकसह उपलब्ध असेल. सोनी सपोर्टिंग इमर्सिव्ह ३ डी साउंड, स्मार्ट डोअर हँडल्स, ३६ डिग्री साराउंड व्ह्यू, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटरिंग, इलेक्ट्रॉनिक पार्क ब्रेक, ड्रायव्हर गुडघा एअरबॅग, पॅसिव्ह कीलेस एंट्री, सतत डिजिटल व्हिडीओ लक्झरी पॅकमध्ये उपलब्ध असतील. एसयूव्हीमध्ये रेकॉर्डिंग आणि वायरलेस चार्जिंगची सुविधा आहे.
आठवड्यातून आपले केस नक्की किती वेळा धुवावे?; जाणून घ्या तज्ज्ञांकडून
सेफ्टी फीचर्स देखील उत्तम
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही एसयूव्ही खूप मजबूत आहे. यामध्ये कंपनीने एकूण ७ एअरबॅग दिल्या आहेत. बरीचशी, ही एसयूव्ही फक्त ५ सेकंदात शून्यावरून ६० किलोमीटर प्रति तास वेग पकडते.