28 Days Weight Loss Diet Plan: अनेकांचा असा समज असतो की, शरीराच्या आरोग्यासाठी मांस खाणे अत्यंत आवश्यक आहे आणि वनस्पती-आधारित अन्न शरीराला योग्य पोषण देण्यासाठी पुरेसे नाही. जर तुम्ही फिट होऊन परफेक्ट फिगर मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आज आपण डॉ. मिकी मेहता यांनी सुचवलेला २८ दिवसांचा डाएट प्लॅन पाहणार आहोत. विशेष म्हणजे हा प्लॅन पूर्णतः शाकाहारी आहे. कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवून कर्करोग आणि इतर भयानक रोगांचा धोका कमी करण्यात मदत करणारा हा प्लॅन असल्याचे डॉक्टर सांगतात. तसेच यामुळे हे रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहून टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका सुद्धा कमी होतो.
पहिले तीन दिवस शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी…
सकाळी ६ वाजता उठल्यावर: एक ग्लास कोमट पाण्यात तुळशी, पुदिना आणि लिंबाचा रस मिसळून प्या.
६.३० वाजता: एक वाटी डाळिंब/खरबूज/लिंबूवर्गीय फळे, शक्यतो हंगामी.
ब्रेकफास्ट साठी सकाळी 8 वाजता: एक ग्लास भाज्यांचा रस (काकडी, भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी एक वनस्पती, पालक आणि लिंबू किंवा दुधी आणि आवळा.)
सकाळी १०. ३० वाजता : एक ग्लास नारळ पाणी
दुपारचे जेवण, दुपारी १ वाजता: सॅलडसह वाफवलेल्या स्प्राउट्सची मोठी वाटी
दुपारच्या जेवणानंतर, दुपारी 2.30 वाजता: एक ग्लास ताक (दोन चमचे घरगुती लो फॅट दही (गाईचे दूध वापरून बनवलेले) जिरेपूड, काळी मिरी, पुदिना आणि धणे)
संध्याकाळी, ४ वाजता: एक कप ग्रीन टी किंवा आल्याचा चहा
संध्याकाळी ५ वाजता: 4-5 बदाम आणि 2-3 अक्रोड
रात्रीचे जेवण, संध्याकाळी ७ वाजता: एक वाटी भाज्यांचे सूप + वाफवलेल्या किंवा शॅलो फ्राय केलेल्या भाज्या
झोपण्याची वेळ, रात्री ९ वाजता: 1 ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून प्या
क्लेनसिंग डाएट: पहिला आठवडा
सकाळी ६ वाजता उठल्यावर: दोन कप पाण्यात 1 कप जिरे, एक इंच आले + 1⁄4 चमचे हळद + चिमूटभर काळी मिरी घालून उकळून घ्या. कोमट झाल्यावर त्यात १ मध्यम लिंबू आणि तुळशीच्या पानाचा रस घाला व प्या.
६. ३० वाजता: एक वाटी फळे, शक्यतो हंगामी फळे, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, खरबूज
ब्रेकफास्ट, सकाळी ८ वाजता: भाज्या, टोमॅटो, लसूण आणि मशरूमसह ओट्स १ वाटी
सकाळी १०. ३० वाजता : एक ग्लास अननस ज्यूस /नारळ पाणी
दुपारचे जेवण, दुपारी 1 वाजता: एक वाटी सॅलड (200 ग्रॅम भाजलेले तीळ, अंबाडी, सूर्यफुलाच्या बिया मिसळून) + डाळ/राजमा/चणे (1 लहान वाटी) + 1 नाचणी /ज्वारीची भाकरी
दुपारच्या जेवणानंतर, दुपारी २.३० वाजता : एक ग्लास ताक (जिरेपूड, काळी मिरी, पुदिना आणि धणे घालून)
संध्याकाळी, ४ वाजता: एक कप ग्रीन टी/कॅमोमाइल, लेमन ग्रास टी
संध्याकाळी ५ वाजता: 4-5 बदाम, 2-3 अक्रोड, मखना
रात्रीचे जेवण, संध्याकाळी 7 वाजता: एक वाटी भोपळा आणि मसूर सूप आणि एक वाटी बीटरूट, काकडी आणि पातीच्या कांद्यासह स्प्राउट्स
झोपण्याची वेळ, रात्री 9 वाजता: 1 ग्लास कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्या
दुसरा आठवडा
सकाळी ६ वाजता उठल्यावर: एक ग्लास कोमट पाण्यात भिजवलेले मेथी दाणे
६. ३० वाजता: फळांची वाटी (हंगामी फळे, अननस आणि खरबूज)
ब्रेकफास्ट , सकाळी 8 वाजता: एक वाटी क्विनोआ चेरी टोमॅटो, पिवळी शिमला मिरची आणि कोथिंबीर घालून
सकाळी १०. ३० वाजता: संत्रे
दुपारचे जेवण, दुपारी 1 वाजता: ऑलिव्ह ऑइलमध्ये शॅलो फ्राय करून मशरूम, फरसबी, गाजर, लसूण आणि पातीच्या कांद्यासह एक वाटी ब्राऊन राईस वापरून फ्राईड राईस बनवू शकता
संध्याकाळी, 4 वाजता: एक वाटी डाळिंब
संध्याकाळी 5: 4-5 बदाम आणि 2-3 अक्रोड
रात्रीचे जेवण, 7 वाजता: अर्धा एवोकॅडो, काकडी, सिमला मिरची, टोफू, धणे, तीळ, सूर्यफूल बिया आणि भोपळ्याच्या बियांनी बनलेले ब्रोकोली सूप आणि सॅलडची एक वाटी
झोपण्याची वेळ, रात्री 9: 1 ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस
झोपा, रात्री 10 वा
तिसरा आठवडा
सकाळी ६ वाजता उठल्यावर: 1 ग्लास कोमट पाणी + 1 मध्यम लिंबाचा रस/ चिमूटभर दालचिनी
६. ३० वाजता: एक वाटी फळे (हंगामी फळे, मनुका, पीच, पपई)
ब्रेकफास्ट , सकाळी 8 वाजता: एक वाटी एवोकॅडो + काकडी + सेलेरी 1 टेबलस्पून चिया सीड्स आणि 5-6 स्ट्रॉबेरी
सकाळी 10.30 वाजता: एक ग्लास कलिंगडाचा रस किंवा नारळ पाणी
दुपारचे जेवण, दुपारी 1 वाजता: कोशिंबीर (200 ग्रॅम) + हंगामी भाज्या + डाळ/राजमा/छोले (1 लहान वाटी + 1 नाचणी /ज्वारी भाकरी )
संध्याकाळी, 4 वाजता: एक कप हिबिस्कस फ्लॉवर चहा/दालचिनी चहा + 6-7 मखना
संध्याकाळी 5 वाजता: 4-5 बदाम + 2-3 अक्रोड
रात्रीचे जेवण, संध्याकाळी 7 वाजता: एक वाटी मशरूम सूप. वाफवलेले किंवा फ्राय केलेली ब्रोकोली, झुकिनी, शतावरी, बीट, रताळे असे सगळे ताहिनी सॉससह ब्लॅक ऑलिव्ह तेलावर परतून घ्या. यात मिरपूड आणि हिमालयीन मीठ ऍड करा.
झोपण्याची वेळ, रात्री 9: एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून प्या
चौथा आठवडा
सकाळी ६ वाजता उठल्यावर: एका ग्लास कोमट पाण्यात बडीशेप/ओवा
६. ३० वाजता: फळांची वाटी (हंगामी फळे, केळी, चेरी)
ब्रेकफास्ट , सकाळी 8 वाजता: काकडी, चेरी टोमॅटो आणि एक मध्यम कप स्प्राऊट्स
सकाळी 10 वाजता: एक मध्यम आकाराचे सफरचंद
दुपारचे जेवण, दुपारी 1 वाजता: कोशिंबिर, बीट, सोयाबीनचे, jalapeño सह एक वाटी सॅलड. एक वाटी भाजी, डाळ आणि एक नाचणीची भाकरी
संध्याकाळ, 4 वाजता: एक कप ग्रीन टी+ मूठभर भाजलेले चणे
संध्याकाळी 5: 4-5 बदाम + 2-3 अक्रोड
रात्रीचे जेवण, संध्याकाळी 7 वाजता: एक वाटी टोमॅटो सूप. ब्राऊन राईससह भाज्या घालून खिचडी एक वाटी. हंगामी भाज्या, भोपळा आणि सूर्यफूल बिया घातलेले सॅलेड
झोपण्याची वेळ, रात्री 9 वाजता: एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि आल्याचा रस घालून प्या
हे ही वाचा<< ‘या’ महिलांच्या मुलांना असतो लठ्ठपणाचा तिप्पट धोका! संशोधनात समोर आली थक्क करणारी माहिती
(टीप: डॉ. मिकी मेहता हे सेलिब्रिटी फिटनेस तज्ज्ञ आहेत, त्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित हा लेख आहे. गरज लागल्यास आपल्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या)