प्रत्येकाला आपण सुंदर दिसाव तसेच आपला चेहरा आकर्षक दिसावा असं वाटत असतं. परंतु काही महिलांना चेहऱ्यावरील असलेले लव अर्थात नको असलेले केस काढून टाकण्यासाठी महिला वेगवेगळ्या पद्धती वापरतात. तर कधी त्यांना वारंवार पार्लरमध्ये जावे लागते. चेहऱ्यावरील नको असलेले केस ही एक अशी समस्या आहे जी शरीरातील कोर्टिसोल नावाच्या हार्मोनच्या पातळीमध्ये चढ-उतार झाल्यामुळे उद्भवते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही महिलांच्या चेहऱ्यावर जास्त केस असतात, ज्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हार्मोनल बदल. हार्मोन्सच्या चढउतारांमुळे केसांची जलद वाढ होऊ शकते. हे अनुवांशिकतेमुळे देखील असू शकते. जर तुम्हालाही चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरील या केसांपासून सुटका मिळवू शकता. तुम्हाला काही प्रभावी आणि सोप्या घरगुती उपायांबद्दल सांगत आहोत, ज्याचा अवलंब करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात.

बेसन आणि हळद मिक्स करून चेहर्‍यावर लावा

जर तुम्हाला चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांचा त्रास होत असेल तर बेसन आणि हळद यांचा पॅक लावा. बेसनामध्ये गुलाबपाणी आणि हळद मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा आणि चेहरा पाण्याने धुवा. याने तुम्हाला चेहर्‍यावरील नको असलेल्या केसांपासून मुक्तता मिळते. तसेच तुम्ही हा पॅक आठवड्यातून दोनदा लावू शकता.

साखर आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण लावा

चेहऱ्यावर नको असलेले केस काढण्यासाठी दोन चमचे साखरेत लिंबाचा रस मिसळा आणि त्यात ८-९ टेबलस्पून पाणी घाला. आता हे मिश्रण गरम करा आणि नंतर थंड होऊ द्या. हे मिश्रण थंड झाल्यानंतर ही पेस्ट तुम्ही स्पॅटुलाच्या मदतीने चेहर्‍यावर लावा. त्यानंतर ही पेस्ट चेहर्‍यावर २०-२५ मिनिटे अशीच राहू द्या. २५ मिनिटांनंतर ही पेस्ट हळुवारपणे चोळून काढा आणि थंड पाण्याने धुवा.

साखर एक नैसर्गिक एक्सफोलिएटिंग एजंट आहे जे गरम केल्यावर केसांना चिकटते आणि चेहऱ्यावरील केस काढून टाकते. लिंबाचा रस गळणाऱ्या केसांसाठी नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतो. तसेच त्वचेचा टोन हलका होण्यास मदत होते. याचा वापर केल्याने वेदनादायक चेहऱ्यावरील वॅक्सिंगपासून सुटका मिळू शकते.

गव्हाचे जाडे भरडे पीठ आणि केळीची पेस्ट लावा

दोन चमचे गव्हाचे जाडे भरडे पीठ पिकलेल्या केळ्यामध्ये मिसळा आणि ही पेस्ट चेहऱ्याच्या केसांवर लावा. १५ मिनिटे मसाज करून थंड पाण्याने चेहरा धुवा, चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांपासून सुटका होईल. गव्हाचे जाडे भरडे पीठ हे एक उत्तम हायड्रेटिंग स्क्रब आहे जे अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी भरलेले आहे. हे त्वचेवरील लालसरपणा दूर करते. तसेच चेहरा चमकदार बनवते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 best home remedies to get rid of facial hair scsm