कोणताही ऋतू असला तरी प्रत्येकाच्या घरात सिलिंग फॅन वापरा जातो. कारण फॅनशिवाय घरात जास्तवेळ बसणे अवघड होते. पण फॅनमधून चांगली हवा येण्यासाठी तो सतत साफ करणे गरजेचे असते. तुम्ही फॅनचा जरी जास्त वापर करत नसलात तरी तो साफ करणे आवश्यक असते. पण सिलिंग फॅन उंचावर असल्याने तो साफ करण्यासाठी शिडी किंवा टेबलची गरज असते. ज्यामुळे काही मिनिटांत फॅन साफ करता येतो. पण अनेकदा गुडघेदुखी, पाठदुखी आणि गर्भधारणेमुळे टेबल, शिडीने फॅन साफ करणे शक्य होत नाही, अशावेळी तुम्ही खालील ट्रिक्स फॉलो करुन काही मिनिटांत फॅन एकदम चकाचक करु शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळीमुळे पंख्याचे ब्लेड वारंवार काळे पडतात अशावेळी ते स्वच्छ करणे गरजेचे आहे. अशा स्थितीत आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही टेबल आणि शिडीशिवाय सिलिंग फॅन स्वच्छ करु शकता.

१) डस्टरचा करा वापर

सिलिंग फॅन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही त्यासाठी खास डिझाइन केलेले क्लिनिंग डस्टरचा वापर करु शकता. तुम्ही ते बाजारातून सहज खरेदी करु शकता. याच्या मदतीने फॅनवर साचलेली धूळ स्वच्छ करणे सोप्पे आहे, कारण हे तुम्ही वळवाल त्याबाजूने सहज वळते, यासाठी तुम्हाला कोणत्याही टेबल किंवा खुर्चीवर चढण्याची गरज लागत नाही.

डस्टरने अशाप्रकारे करा फॅन स्वच्छ

डस्टरने सीलिंग फॅन स्वच्छ करायचा असेल तर प्रथम फॅनच्या सर्व पातींवरील सर्व धूळ साफ करुन घ्या. यावेळी घाईगडबडीत कोणताही पात तुटणार नाही किंवा वाकणार नाही याची काळजी घ्या. आता एका बादलीत पाणी घ्या, त्यात अर्धा कप खोबरेल तेल, मीठ, थोडेसे व्हिनेगर आणि डिटर्जंट पावडर टाकून लिक्विड बनवा. मग त्यात डस्टर चांगले भिजवून ते पिळून घ्या आणि फॅन आरामात स्वच्छ करा.

२) व्हॅक्यूम क्लिनरचा करा वापरा

आजपर्यंत तुम्ही व्हॅक्यूम क्लिनरचा वापर फक्त जमिनीवरील धूळ साफ करण्यासाठी केला असेल. पण याच्या मदतीने तुम्ही फॅन देखील़ सहज साफ करू शकता आणि त्यामुळे रुममध्ये जास्त कचरा होत नाही.

त्यासाठी व्हॅक्यूमचे हँडल पकडून पंख्याच्या ब्लेडवर फिरवा. त्यावर ब्रश जोडण्यास विसरू नका जेणेकरून अडकलेली धूळ सहज निघून जाईल.

३) डस्टिंग ब्रशनेही करु शकता स्वच्छ

डस्टिंग ब्रशनेही तुम्ही फॅनवरील धूळ सहज स्वच्छ करु शकता. घराच्या भिंतींवरील जाळे आणि धूळ काढण्यासाठी वापरत असलेल्या डस्टिंग ब्रशच्या मदतीने तुम्ही पंखा देखील साफ करू शकता, डस्टिंग ब्रशने फॅनच्या पाती सहज स्वच्छ करता येतात.

२ महिन्यातून एकदा तरी घरातील सिलिंग फॅन साफ करणे आवश्यक आहे. नाही तर धूळ सतत खाली पडत राहते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 best way to clean a high ceiling fan how to clean a ceiling fan sjr
Show comments