How To Get Jawline and Slim Face: गुटगुटीत गोबरे गाल गे एकेकाळी सौंदर्य, समृद्धीचे प्रतीक मानले जात होते. पण अलीकडे बदललेल्या ब्युटी निकषांप्रमाणे लहान, बारीक व नाजूक चेहरा हा अनेकांना हवाहवासा वाटू लागला आहे. आणि खरंतर त्वचातज्ज्ञही सांगतात की गुटगुटीत गाल हे काही वेळा अतिरिक्त फॅट्सचा सुद्धा परिणाम असू शकतात. जेव्हा तुमच्या शरीरात अनावश्यक फॅट्सचे प्रमाण वाढू लागते तेव्हा शरीरातील सर्वच अवयव बदलू लागतात. जेव्हा फॅट्स वाढल्याने गाल जाडसर दिस लागतात तेव्हा त्यातील चमक व झळाळी सुद्धा नाहीशी होते उलट काळपट व पिवळसर रंगांचे गाल दिसू लागतात. हे टाळण्यासाठी आपल्याला केवळ चेहऱ्यासाठीचे काही व्यायाम करणे आवश्यक आहे.
आज आपण चेहऱ्यावरील फॅट्स कमी करण्यासाठी व छान नाजूक चेहरा मिळवण्यासाठी तीन सोपे व्यायाम बघणार आहोत…
१) पहिला व्यायाम हा ऍक्युप्रेशरचा प्रकार आहे. यामध्ये आपल्याला चेहऱ्याचा १० सेकंदासाठी पाऊट (चंबू) करणार आहोत. मग तुम्हाला चेहरा रिलॅक्स करायचा आहे. हा व्यायाम चार ते पाच वेळा करायचा आहे.
२) मान जितकी शक्य असेल तितकी मागे न्या. मग तोंड उघडून तुमच्या अंगठयाच्या दाबाने हनुवटी वर उचलून धरा. पाच सेकंड त्याच स्थितीत राहून मग मान खाली घ्या. हा व्यायाम सुद्धा चार ते पाच वेळा करायचा आहे
३) तिसरा व्यायाम आहे, बलून फेस. म्हणजेच यात तुम्हाला तोंडात हवा भरून गाल फुगवायचे आहेत. १० ते १५ सेकंद असाच चेहरा ठेवा मग चेहरा रिलॅक्स करा. या व्यायामात तुम्हाला डोळे पूर्ण उघडे ठेवायचे आहेत.
हे ही वाचा<< भजी व वडे जास्त तेल शोषून घेऊ नये यासाठी करा ‘हे’ १० सोपे उपाय; डॉक्टरकडे फेऱ्यांचे पैसे वाचवा!
फिटनेस एक्स्पर्ट सांगतात की, हे व्यायाम तुम्हाला बसल्या जागी करता येणार आहेत त्यामुळे तुम्हाला दिवसातून शक्य होईल तेवढ्या वेळा हे व्यायाम करता येतील. विनाकारण, चेहऱ्यावर ताण देऊ नका. तर ब्युटी एक्स्पर्ट सांगतात की, तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही त्वचेच्या टाइटनिंगसाठी हळद, मुलतानी मातीचे फेसपॅक लावू शकता. निदान ३० दिवसांसाठी हे व्यायाम नियमित करा यानंतर तुम्हाला दिसलेल्या प्रभावानुसार तुम्हाला स्वतःलाच या व्यायामाची गोडी लागू शकते.