Running Benefits : धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा आरोग्याकडे लक्ष देत नाही. यामुळे वजनवाढीसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा इच्छा असूनही वेळेच्या अभावी आपण व्यायाम आणि योगा करणे टाळतो. तुम्हाला सुद्धा व्यायाम करायला किंवा योगा करायला वेळ मिळत नाही? तर टेन्शन घेऊ नका आज आपण एक असा व्यायाम जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होईल. इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओद्वारे संदर्भात माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये फक्त ३० मिनिटे धावण्याचे भरपूर फायदे सांगितले आहे.
या व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे नियमित ३० मिनिटे धावण्याचे फायदे –
- धावण्यामुळे आनंदी हार्मोन्स निर्माण होतात ज्यामुळे तुम्ही नेहमी आनंदी राहता.
- धावण्यामुळे तुमच्या पायाचे स्नायू मजबूत होतात ज्यामुळे तुम्ही स्वत:ला फिट वाटतात.
- तुमच्या शरीरातील अनावश्यक फॅट्स कमी होतात. ज्यामुळे लठ्ठपणा दूर होऊ शकतो. वजन कमी करण्यास किंवा पोट कमी करण्यासाठी धावणे अधिक फायदेशीर ठरते.
- तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते ज्यामुळे हृदयाविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो.
- धावण्यामुळे तुमचा मेंदू अधिक सक्रीय होतो आणि तुम्ही मानसिक ताण हाताळण्यास अधिक सक्षम होता.
- नियमित धावण्यामुळे तुमची झोप नीट होते आणि तुम्ही सकाळी उठता तेव्हा आळस येत नाही. तुम्हाला फ्रेश वाटते.
- धावण्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती अधिक चांगली होते ज्यामुळे तुम्ही लवकर आजारी पडत नाही.
- धावण्यामुळे तुमचा स्टॅमिना वाढतो.
neurohealingtherapy या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “३० मिनिटे धावण्याचे आव्हान” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिलेय, “मला धावणे खूप आवडते.” अनेक युजर्सनी धावण्याचे अनेक फायदे सांगितले आहे. एका युजरने लिहिलेय, “धावण्यामुळे घाम बाहेर पडतो आणि स्किन ग्लो करते.” तर एका युजरने लिहिलेय, “धावण्याचे असंख्य फायदे आहेत.” काही युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. त्यांनी माहिती सांगितल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.