Tulsi homemade facepack: घरोघरी सकाळ-संध्याकाळ तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये तुळस या रोपाला धार्मिक आणि वैद्यकीयदृष्ट्या प्रचंड महत्त्वाचे समजले जाते. कोणतीही पूजा, कार्य असू दे तुळस ही लागतेच. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की, या तुळशीचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा उजळ आणि चमकदार ठेवू शकता.तिचा योग्य प्रकारे वापर केल्याने आपल्याला सौंदर्यही मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेहऱ्याच्या अनेक समस्यांपासून मुक्त होण्यास आणि आपल्या त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. तसेच ते आपली त्वचा चमकदार बनवते आणि सुरकुत्या आणि रेषा देखील दूर करू शकते. चला तर मग आज याच तुळशीपासून बनवलेले चार घरगुती नैसर्गिक फेसपॅक पाहुयात. तुळशीचे हे वेगवेगळे फेसपॅक त्वचेच्या विविध समस्या सोडवतील.

तुळशीचा नैसर्गिक क्लिन्झर

तुमच्या त्वचेवर जमा झालेल्या कोरड्या आणि मृत पेशींपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तुळशीचा नैसर्गिक क्लिन्झर म्हणून वापर करू शकता. हा क्लींजिंग फेस मास्क बनवण्यासाठी तुम्हाला तुळशीची पावडर लागेल, तुम्ही तुळशीची पावडर घरी बनवू शकता. तुळशीची पावडर बनवण्यासाठी तुम्हाला तुळशीची ताजी पाने लागतील आणि ती सुकण्यासाठी सुमारे पाच दिवस उघड्यावर ठेवावी लागतील. ती कोरडे झाली की त्यांची बारीक पावडर करून घ्यावी. मास्क बनवण्यासाठी एक चमचा वाळलेल्या तुळशीची पावडर आणि तितकेच दही घेऊन घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट नीट मिक्स करून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर, ते स्क्रब करा आणि आपला चेहरा चांगला धुवा.

अँटी-एक्ने तुळशी फेस मास्क

तुम्ही तुळशी आणि कडुलिंबाच्या पानांचा वापर करून अँटी-एक्ने फेस मास्क बनवू शकता. तुम्हाला फक्त दोन लवंगांसह कडुलिंब आणि तुळशीची पाने लागणार आहेत. त्यातर त्यात थोडे पाणी घालून बारीक करून घट्ट पेस्ट बनवायची आहे. ही पेस्ट डोळ्याभोवतीचा भाग टाळून हे चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर हा फेस मास्क थंड पाण्याने स्वच्छ धुवा. हा फेस मास्क मुरुम आणि डाग कमी करेल आणि तुमची त्वचा स्वच्छ करेल.

हेही वाचा >> आरोग्य जपायचे तर प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी नकोच! मात्र असे का? त्याची करणे जाणून घ्या…

रंग उजळवण्यासाठी तुळशीचा फेसपॅक

जर तुम्हाला तुमची त्वचा उजळवायची असेल, तर तुम्ही हा तुळशीचा फेस मास्क नक्कीच वापरून पहा. हा मास्क बनवण्यासाठी एक चमचा तुळशीची पेस्ट आणि एक चमचा दूध मिसळा. हा मास्क लावा आणि १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा.

त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी फेसपॅक

डागमुक्त त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही हा फेस मास्क वापरु शकता. हा फेसपॅक चेहऱ्यावरील डाग कमी करेल. ही पेस्ट बनवण्यासाठी कडुलिंब आणि तुळशीच्या पाने घ्या त्यात थोडे पाणी घालून बारीक करून घट्ट पेस्ट बनवा. लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका आणि मुरुमांवर लावा. १० मिनिटांत ते सुकल्यानंतर, धुवा आणि त्वचा कोरडी करा. पण हा फेस मास्क वापरल्यानंतर लगेच उन्हात बाहेर पडू नका.

[टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये]