उन्हाळ्यात अनेकदा प्रयत्न करुनही दूध खराब होते. अशावेळी खराब दूध बहुतांश लोक फेकून देतात. पण हे खराब दूध फेकून न देता त्याचा वापर करुन तुम्ही अनेक वेगळे पदार्थ तयार करु शकता. पण हे पदार्थ अनेकदा बनवायचे कसे असा प्रश्न पडतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात खराब दूधापासून तयार होणार पदार्थ सांगणार आहोत. जे उन्हाळ्यात तुमच्यासाठी आरोग्यदायी ठरु शकते.
नासलेल्या दुधापासून तयार होणारे पदार्थ
१) छेना तयार करा
खराब झालेल्या दूधात थोडे लिंबू मिसळून चांगले फेटवून घ्या. आता हे तयार मिश्रण म्हणजे छेना बाहेर काढून तसेच खाऊ शकता. तसेच त्याच थोडे मीठ टाकूनही तुम्ही याचे सेवन करू शकता. हा छेना चवीसोबतच आरोग्यासाठीही चांगला आहे. छेना बनवण्याच्या पद्धतीही वेगळ्या आहेत.
२) भुर्जी बनवा
फाटलेल्या दुधातून पनीर काढून त्यात एक कांदा आणि मिरची घालून मस्त भुर्जी बनवा. आता ही भुर्जी चपाती किंवा पराठ्यासोबत खाऊ शकता. ही चवीलाही खूप टेस्टी लागते. यात प्रथिनेही भरपूर प्रमाणात असल्याने त्याचे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदे आहेत.
३) पराठा तयार करा
खराब झालेल्या दुधातून तुम्ही पनीर तयार करा, त्यात कांदे आणि मिरच्या घालून पनीर पराठा तयार करु शकता. हा पराठा तुम्ही नाश्त्यात खाऊ शकता किंवा दुपारच्या जेवणातही खाऊ शकता. हे अतिशय चविष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
४) ब्रेड सँडविच बनवताना वापरा
ब्रेड सँडविचसाठी स्टफिंग म्हणून तुम्ही खराब दूधापासून तयार केलेले पनीर वापरू शकता. हे खाण्यासाठीही चविष्ट असते. यामध्ये भरपूर प्रथिने असतात जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. म्हणून खराब झालेले दूध फेकून न देता त्यातून फक्त छेना बाहेर काढा आणि त्याचे सेवन करा.
पण खराब दूध जर आंबट किंवा कडू लागत असेल तर त्याचा वापर करु नका.
( हा लेख सामान्य माहितीसाठी आहे , कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)