Kitchen Cleaning Hacks : हल्ली अनेकांच्या घरात भांड्यांचा स्टँडऐवजी किचन ट्रॉलीज दिसून येतील. किचनमधील लहान-मोठ्या भांड्यांपासून वस्तूंपर्यंत सर्व गोष्टी अगदी आरामात यात ठेवता येतात. किचनमध्ये सामानाचा पसारा दिसू नये आणि सगळं टापटिप ठेवण्यासाठी ट्रॉलीज फायदेशीर ठरतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्यात कप्पे तयार करुन घेऊ शकता. पण या ट्रॉलिज बाहेरून जितक्या सुंदर दिसतात तितक्याच आतून लवकर खराब होतात.

विशेषत: भांडी धुतल्यानंतर ती कोरडी न करताच ट्रॉलीमध्ये ठेवल्याने त्याच मोठ्याप्रमाण घाण जाऊन जमा होते. शिवाय आतून गंज येत त्यात बुरशीचे प्रमाण वाढते. म्हणून ट्रॉलीच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अशावेळी या ट्रॉलीज साफ करण्यासाठी नेमक्या कोणत्या ट्रिक्स वापरायच्या जाणून घेऊ….

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता? जाणून घ्या स्वच्छ करण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
How to use banana peel for mosquito
घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट

किचन ट्रॉली किती दिवसांनी साफ करावी?

किचनमध्ये बसवलेली भांडीची ट्रॉली महिन्यातून किमान एकदा साफ करायला हवी, यामुळे तुम्ही ट्रॉलीची चमक कायम ठेवू शकता. मात्र, पावसाळ्यात त्याची वारंवार साफसफाई करावी लागते. कारण पावसातील दमट वातावरणात ओल्यामुळे त्यात बुरशी वाढू शकते.

हेही वाचा : Kitchen Jugaad : झोपण्याआधी बेडवर चहाची गाळणी फिरवा; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

किचन ट्रॉली साफ करण्यासाठी वापरा ‘या’ गोष्टी

किचन ट्रॉलीमध्ये आतून अनेकदा खूप तेलकट, चिकट होतात. अशावेळी त्या साफ करण्यासाठी एका भांड्यात १ चमचे मीठ, बेकिंग सोडा, डिशवॉशिंग लिक्विड आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. आता तयार पेस्ट स्क्रबरच्या साहाय्याने ट्रॉलीला लावा आणि स्वच्छ करा. यामुळे ट्ऱॉलीवरील घाणी आणि गंजाचे डाग निघून जातील.

तुम्ही स्क्रबरऐवजी ब्रशही वापरू शकता. पण ट्रॉली साफ करताना त्यात पाण्याचा एक थेंबही सांडणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा संपूर्ण ट्ऱॉली गंजण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : उशीचे मळलेले कव्हर टॉयलेट सीटपेक्षाही असते घाण, आजारांचा धोका टाळण्यासाठी कव्हर किती दिवसांनी बदलावे? जाणून घ्या

अशाप्रकारे चांदीसारखी चमकेल स्टीलची किचन ट्ऱॉली

ट्रॉलीची घाण साफ केल्यानंतर त्याची चमक वाढवण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता. यासाठी ट्रॉली पूर्णपणे सुकल्यानंतर कापसाच्या बॉलमध्ये खोबरेल तेलाचे काही थेंब घाला आणि संपूर्ण ट्रॉलीवर लावा. त्यामुळे ट्रॉली लवकर गंजणार नाही आणि ट्रॉलीची चमकही वाढेल.

खोबरेल तेलाऐवजी तुम्ही मोहरीचे तेलही वापरू शकता. तसेच ते वापरताना प्रमाणाची विशेष काळजी घ्यावी. तेल लावल्यानंतर ट्रॉलीत सामान ठेवण्यापूर्वी सुमारे १ तास ओपन ठेवा.

या गोष्टींची घ्या काळजी

१) ट्रॉलीमध्ये कधीही ओली भांडी ठेवू नका.

२) ट्रॉली ओल्या कापडाने पुसल्यानंतर सुकण्यासाठी ओपन करुन ठेवा. ट्रॉलीतील कप्पे बाहेर निघणारे असतील तर तुम्ही एक-एक कप्पा बाहेर काढून स्वच्छ करा.

३) दमट वातावरणात दररोज ट्रॉली कोरड्या कापड्याने स्वच्छ करा.