ऑनर कंपनीचा 48 मेगापिक्सल कॅमेरा असलेला बहुप्रतिक्षित Honor View 20 हा स्मार्टफोन भारतात 29 जानेवारी रोजी लाँच होणार आहे. 48 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असलेला हा भारतातील पहिला फोन आहे. याशिवाय भारतात लाँच होणारा हा पहिला पंचहोल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आहे. या फोनच्या डिस्प्लेवर कॉर्नरमध्ये पंचहोलमध्ये फ्रंट कॅमेरा बसवला आहे. सेल्फीसाठी 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कंपनीने हा स्मार्टफोन चीनमध्ये डिसेंबर महिन्यात लाँच केला होता. तेव्हापासून या फोनबाबत बरीच चर्चा होती. या महिन्यात 22 जानेवारी रोजी हा फोन पॅरिसमध्ये लाँच केला जाईल, त्यानंतर 29 जानेवारी रोजी भारतात लाँच केला जाणार आहे. हा मोबाइल 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅम अशा दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असेल. तसंच मेमरीच्या बाबतीतही 128 जीबी आणि 256 जीबी मेमरी अशाप्रकारचे दोन पर्याय असतील. भारतात या मोबाइलची किंमत 35 ते 40 हजार रुपये इतकी असण्याची शक्यता आहे.

फिचर्सच्या बाबतीत सांगायचं झाल्यास यामध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असून हायसिलीकॉन किरीन ९८० प्रोसेसर आहे. 4000 mAh क्षमतेची बॅटरी असलेल्या या फोनमध्ये अत्याधुनिक अँड्रॉयड 9 ‘पाय’चा सपोर्ट आहे.