प्रत्येक महिलेला आपले केस लांबसडक, दाट असावे असं वाटत असतं. मात्र अनेकदा काही कारणांमुळे केस गळतात किंवा कोरडे होतात. तुमची हीच समस्या आता कढीपत्ता दूर करेल. आजकाल केसांची काळजी घेण्यासाठी कढीपत्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कढीपत्ता केसांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर असल्याचे सिद्ध होते आणि या पानांचा वापर करणे देखील सोपे आहे. हेअर वॉशमध्ये कढीपत्ताचा वापर करण्यासाठी याचे पाणी बनवता येऊ शकते. कढीपत्त्याचे पाणी कमी वेळात तयार केले जाऊ शकते, ज्यामुळे या पाण्याने डोके धुतल्यावर केस देखील चमकू लागतात. कढीपत्त्याच्या पाण्याचे सर्व फायदे येथे जाणून घ्या.
केस धुण्यासाठी कढीपत्त्याचे पाणी | curry leaves for hair wash
कढीपत्त्याचे पाणी तयार करण्यासाठी, पाण्यात १५ ते २० कढीपत्ता उकळण्यासाठी ठेवा. जेव्हा पाणी उकळून अर्धे होईल तेव्हा समजून घ्या की तुमच्या कढीपत्त्याचे पाणी तयार आहे. हे पाणी थंड करा आणि नंतर शॅम्पू केल्यानंतर या पाण्याने केस धुवा.
कुरळ्या केसांवर फायदेशीर
कुरळे केसांवर कढीपत्त्याचे पाणी वापरता येते. हे पाणी कुरळ्या केसांना मऊ करते आणि त्यांना सांभाळणे सोपे जाते. तसेच या पाण्याने कोरड्या केसांची समस्या दूर होते.
( हे ही वाचा: कोणतीही औषधे न घेता वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल होईल झपाट्याने कमी? डॉक्टरांनी दिलेला ‘हा’ सल्ला एकदा वाचाच)
केस मजबूत होतात
कढीपत्त्याच्या पाण्याने केस मजबूत होतात. या पाण्याने केसांचे तंतू मजबूत होतात, ज्यामुळे केस गळणे थांबते. या पाण्यात बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन बी देखील चांगले असते, जे केसांचे पोषण करते.
केस काळे राहतात
कढीपत्त्याची पेस्ट बनवून केसांना लावल्यास केस पांढरे होण्यापासून सुटका मिळते. तसेच कढीपत्त्याच्या पाण्याने केस नियमित धुतल्याने केस पांढरे होण्याची समस्या होत नाही. यामुळे केस हळूहळू काळे होण्यासही मदत होते.
( हे ही वाचा: तुमच्या वयानुसार तुमची Blood Sugar किती हवी? जाणून घ्या ‘हा’ सोपा तक्ता)
कोंडा दूर राहतो
थंडीचं हवामानात केसांमध्ये कोंडा पाहायला मिळतो. कढीपत्त्याचे पाणी कोंडा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. या पाण्याने केसांमधला कोंडा दूर होतो.