थंडी आली की त्वचा कोरडी पडायला लागते. दरम्यान यावेळी चेहऱ्याच्या त्वचेबरोबरच पायांची विशेषत: टाचेच्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. टाच पायांच्या सौंदर्यावर भर देतात. भेगा पडलेल्या पायांमुळे कधी-कधी लोकांसमोर लाजिरवाणे व्हावे लागते.अशातच हिवाळ्यात टाच फुटण्याची समस्या अधिक उद्भवत असते. कारण या ऋतूमध्ये आपण पाण्याचे सेवन कमी करतो, त्यामुळे शरीरात निर्जलीकरण होते. टाचांना भेगा पडणे ही एक सामान्य पायांची समस्या आहे जी सामान्यतः कोरड्या त्वचेमुळे होते.
टाच भेगा पडणे याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पायाच्या टाचांपर्यंत पुरेसा ओलावा न पोहोचणे. जेव्हा ही समस्या अधिक वाढू लागते, तेव्हा टाचेच्या भेगांमधून रक्त येऊ लागते. हिवाळ्यात टाचांना भेगा पडणे जास्त त्रासदायक असते. हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्याने तुम्हालाही त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
मध वापर करा
भेगा पडलेल्या टाचांवर उपचार करण्यासाठी मध हा सर्वोत्तम घरगुती उपाय आहे. कारण मधामध्ये एंटीमाइक्रोबियल आणि एंटीबैक्टीरियल हे गुणधर्म असतात जे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही टाचांना भेगा पडू नये यासाठी टाचांवर मध लावू शकता.
खोबरेल तेल
खोबरेल तेल देखील भेगा पडलेल्या टाचांसाठी खूप फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी भेगा पडलेल्या टाचांवर एक चमचा खोबरेल तेल लावा आणि झोपा, तुम्ही मसाज देखील करू शकता. रात्री टाचांना खोबरेल तेल लावून मोजे घाला. महिनाभर असे केल्याने टाचांच्या भेगा दूर होऊ शकतात.
पुरेसे प्रमाणात पाणी प्या
टाचांना तडे जाण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तेथे पाणी न पोहोचणे, त्यामुळे टाचांपर्यंत ओलावा टिकून राहत नाही. सामान्यतः लोकांना हे माहित नसते की टाचांना भेगा पडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पाण्याची कमतरता, म्हणून पुरेसे पाणी प्या.
भेगा पडलेल्या टाचांना पाणी लावून एक्सफोलिएट करा
पायांच्या टाचांना ओलावा नसल्याने टाचांना तडे जातात, त्यामुळे टाचांना दिवसातून किमान ५-६ वेळा पाण्यात ठेवा. भेगा पडलेल्या टाचांपासून सुटका मिळवण्यासाठी दररोज २० मिनिटे पाय कोमट पाण्यात ठेवा. हे काम किमान एक महिना रोज करा. याशिवाय स्क्रबर क्रीमने टाचांना एक्सफोलिएट करा.
लिक्विड बॅंडेज
जर तुम्ही घराबाहेर जात असाल तर तुमच्यासाठी लिक्विड बँडेज हा उत्तम पर्याय आहे. ही बँडेज द्रवपदार्थापासून बनलेली आहे. जी टाचांमध्ये सेट केली जाते. बाजारात अनेक प्रकारच्या लिक्विड बँडेज उपलब्ध आहेत. तुम्ही कामानिमित्त बाहेर जाताना टाचांमध्ये लावा, याने तुम्हाला टाचांच्या भेगांपासून आराम मिळेल.