5 DIY Lip Care : ओठांची त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदनशील असल्याने ओठ कोरडे होणे आणि फुटणे ही बाब सामान्य आहे. कोणत्याही वयात आणि ऋतूत ओठ फुटण्याची समस्या जाणवू शकते. पण, हिवाळ्यात हा त्रास वाढतो. हिवाळ्यातील बोचरी थंडी आणि कोरडी हवा आपल्या नाजूक ओठांच्या त्वचेचे नुकसान करू शकते. त्यामुळे ओठांवर कोरडेपणा, भेगा पडणे, तसेच काही वेळा वेदना जाणवू शकतात. अशाने ओठ दिसायला अनाकर्षक वाटतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा वेळी ओठांवरील ओलावा टिकून राहण्यासाठी तुमच्यापैकी अनेक जण ओठांवर जीभ फिरवतात. परंतु, ही सवय तुमच्या ओठांचे अधिक नुकसान करू शकते. त्यामुळे थंडीच्या महिन्यांतही ओठ मुलायम, गुलाबी ठेवण्यासाठी गुरुग्राममधील सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या सल्लागार, डर्मेटॉलॉजिस्ट डॉ. सीमा ओबेरॉय लाल यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत; ज्या फॉलो करून तुम्ही हिवाळ्यात ओठांची काळजी घेऊ शकता.

हिवाळ्यात ओठ कोरडे का होतात?

थंड तापमान, कमी आर्द्रता व ओठांना जीभ लावण्याची सवय यांमुळे हिवाळ्यात ओठ फाटण्याची समस्या जाणवते. या गोष्टींमुळे ओठांमधील नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी होते; शिवाय शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतरही ही समस्या वाढतेय, असे डॉ. सीमा ओबेरॉय लाल म्हणाल्या.

जर तुम्हीही कोरड्या आणि फुटलेल्या ओठांच्या समस्येने त्रस्त असाल, तर काही विशेष काळजी घेऊन तुम्ही त्यांना मुलायम आणि मऊ करू शकता. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांनी सांगितलेले खालील उपाय करू शकता.

हिवाळ्यात ओठांची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स

१) हायड्रेशन : भरपूर पाणी प्यायल्याने शरीराची एकूण हायड्रेशन पातळी राखण्यास मदत होते, ओठ कोरडे होण्यापासून रोखता येते. त्याशिवाय तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी ह्युमिडिफायर वापरल्याने हवेत आर्द्रता वाढू शकते.

२) एक्सफोलिएट : ओठांवरची कोरडी, फ्लॅकी त्वचा काढून टाकण्यासाठी नियमित एक्सफोलिएशन आवश्यक आहे. त्यासाठी साखर आणि मध एकत्र करून, ते ओठांवर स्क्रब करा. पण जास्त एक्सफोलिएट करू नका; अन्यथा ओठांचे नुकसान होऊ शकते.

३) लिप बाम : चांगल्या दर्जाच्या मॉइश्चरायझिंग लिप बामचा वापर करा. बिसवॅक्स, शिया बटर किंवा कोकोआ बटर यांसारखे घटक असलेले लिप बाम निवडा. ते तुमच्या पर्समध्ये ठेवा आणि दिवसभर ते ओठांवर लावा. विशेषतः घराबाहेर जाण्यापूर्वी याचा वापर करा.

४) ओठांवर जीभ फिरवणे टाळा : ही एक नैसर्गिक प्रवृत्ती असली तरी ओठांवरून जीभ फिरवल्याने खरोखर ओठांचे खूप नुकसान होते. या कृतीमुळे लाळेचे लवकर बाष्पीभवन होते; ज्यामुळे तुमचे ओठ पूर्वीपेक्षा कोरडे होतात. थंड वाऱ्यापासून ओठांचे संरक्षण करण्यासाठी स्कार्फ किंवा टर्टलनेक वापरणे फायद्याचे ठरू शकते.

५) DIY रात्री करा हे उपचार : झोपण्यापूर्वी पेट्रोलियम जेली किंवा हायड्रेटिंग लिप मास्क वापरा. त्यामुळे तुमचे ओठ रात्रभर मॉइश्चराइझ राहतात आणि रात्रभर कोरडेपणा जाणवत नाही.

फुटलेल्या ओठांच्या समस्येवर उपचार करूनही जर फरक पडत नसेल, तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण- यामागे अनेकदा काही वेगळी समस्या असू शकते. त्यामुळे डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे, असेही डॉ. लाल म्हणाल्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 diy lip care chapped lips winter lipcare remedies dermatologist how to get soft supple and pink lips sjr
Show comments