Furniture Maintenance Tips : आपल्यापैकी अनेकांच्या घरात एकतरी फर्निचर असते. सुंदर आणि नीटनेटके फर्निचर घराच्या सौंदर्यात अधिक भर घालते. यामुळे बहुतांश लोकांना घरात सुंदर फर्निचर असावे असे वाटते. डिझायनर फर्निचर दिसण्यास जितके सुंदर असते तिचकीच त्यांची काळजी घेणेही महत्वाचे असते. लाकडी फर्निचरची काळजी न घेतल्यास ते लवकर खराब होण्याची भीती असते. यात पावसाळ्यात ओलसरपणामुळे लाकडी फर्निचर पटकन खराब होते. तर अनेकांच्या घरात पावसाळ्यात पाणी शिरते, अशावेळी फर्निचर खराब होऊ नये म्हणून काय उपाय करावे, जाणून घेऊ…
पावसाळ्यात लाकडी फर्निचरची कशी घ्याल काळजी
१) घरातील लाकडी सोफा सेट ओलसरपणापासून वाचवायचा असेल तर त्यात कापूर आणि नॅफथलीनचा वापर करा, फर्निचरमधील ओलसरपणा कमी करण्यासाठी हे दोन्ही चांगले पर्याय आहेत. यामुळे फर्निचरमधील आर्द्रता कमी होते, तसेच फर्निचरचे बुरशी आणि कीटकांपासून संरक्षण होते.
२) पावसाळ्यात लाकडी फर्निचर बाहेर नेणे टाळा. शिपमेंटदरम्यान ओलसर हवामान असल्यास तुमच्या फर्निचरचे नुकसान होऊ शकते. फर्निचरची काळजी घेण्यासाठी वार्निशिंग हा एक उपयुक्त मार्ग असू शकतो. पावसाळ्याच्या एक महिना आधी तुम्ही कोणतेही लाकडी फर्निचर पॉलिश करू शकता.
३) पावसाळ्यात लाकडी फर्निचरचे रिनोव्हेशन करू नका. हवामानातील आर्द्रतेमुळे लाकडी फर्निचर कमकूवर होते, अशा स्थितीत ते खराब होण्याचा धोका वाढतो. पावसाळ्यात लाकडी फर्निचरचे संरक्षण करण्यासाठी सर्व लाकडी फर्निचर भिंतीपासून किमान ६ इंच दूर ठेवा.
४) लाकडी फर्निचर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमी कोरड्या कापडाचा वापर करा. ओल्या कापडाने पुसणे किंवा साफ केल्याने तुमचे सुंदर लाकडी फर्निचर खराब होईल. फर्निचरवर ओले कपडे कधीही वाळवू नका.
५) फर्निचरचा येणारा कुबट वास दूर करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता.