Home Remedies: चेहऱ्यावरील मृत पेशींखाली तेल साचल्यामुळे त्वचेवर लहान दाण्यांच्या रूपात त्वचा निघू लागते आणि हवेच्या संपर्कात आल्याने ऑक्सिडायझेशन होऊन काळी पडते. यालाच ब्लॅकहेड्स म्हणतात. हे ब्लॅकहेड्स बहुतांशी नाकाजवळ येतात, जे काढणे फार कठीण असते कारण ते मुळापासून त्वचेला चिकटलेले असतात आणि सहज निघायचं नाव घेत नाहीत. चला असे घरगुती उपाय जाणून घेऊयात, जे आजींच्या काळापासून चालत आलेले आहेत आणि समस्या दूर करण्यात मदत करतात.
घरगुती उपाय
अंड- एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा. आता हे मिश्रण ब्लॅकहेड्सच्या ठिकाणी लावा आणि १५-२० मिनिटे कोरडे होऊ द्या. शेवटी कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही ते आठवड्यातून दोनदा वापरू शकता.
(हे ही वाचा: Photos: उष्माघातापासून बचाव करण्यासाठी करा ‘या’ चार पेयांचे सेवन!)
बेकिंग सोडा – एका चमचा बेकिंग सोडामध्ये दोन चमचे पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि ब्लॅकहेड्सवर लावा. १०-१५ मिनिटे ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. हे एक्सफोलिएटर म्हणून काम करते आणि चेहऱ्यावरील तेल देखील शोषून घेते.
(हे ही वाचा: Amazon फ्रेश कडून मँगो महोत्सवची घोषणा! २-३ तासात मिळणार घरपोच डिलेव्हरी)
ग्रीन टी- एक चमचा हिरव्या चहाची पाने घ्या आणि पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर २० मिनिटांनी कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
केळीचे साल- ब्लॅकहेड्सवर केळीच्या सालीचा आतील भाग चोळल्याने फायदा होतो. हे ब्लॅकहेड्स कमी करण्याचे काम करते.
(हे ही वाचा: Diabetes Control: पालक साखर नियंत्रित करण्यासाठी आहे गुणकारी, जाणून घ्या फायदे)
हळद- अँटिऑक्सिडंटने समृद्ध हळद ब्लॅकहेड्सवर प्रभावी ठरते. हळदीमध्ये खोबरेल तेल घाला आणि पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर १०-१५ मिनिटे लावून ठेवा आणि धुवा. हे आठवड्यातून २ ते ३ वेळा करता येऊ शकते.
(हे ही वाचा: बाजरीचा आहारात समावेश करण्याचे आहेत उत्तम फायदे, मधुमेह आणि हृदयरोगींसाठी अत्यंत फायदेशीर)
( हा लेख केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)