वाढत्या वजनाचा सर्वांनाच त्रास होतो. लठ्ठपणा थोडा वाढला तर शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. कोविडमुळे गेल्या दोन वर्षांपासून लोक घरून काम करत होते, ज्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम झाला तो म्हणजे वाढलेलं वजन. लठ्ठपणा वाढण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे घरातून काम करत असल्यामुळे आपली धावपळ थांबली आणि रुटीन बदललं. ऑफिसची कामे घरून केल्याने शरीरावर वाईट परिणाम झाला आहे. घरातून काम केल्याने लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. या काळात खाण्यापिण्यावर जास्त भर होता आणि शरीराच्या हालचाली कमी होत्या, त्यामुळे लोक लठ्ठपणाचे बळी पडले.

करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता पुन्हा नियमित ऑफिस सुरू झाले आहे, त्यामुळे तुम्हीही तुमचे वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतात. तर, वजन कमी करण्यासाठी तुम्ही ऑफिसमध्ये काही व्यायाम करू शकता. ऑफिसमध्ये काम करताना तुम्ही वाढते वजन कसे कमी करू शकता ते जाणून घ्या.

Morning dizziness reason
सात-नऊ तासांची झोप पूर्ण होऊनही तुम्हाला सकाळी थकवा जाणवतो?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
cholesterol range these Six morning habits to lower cholesterol level says cardiologist expert
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ सहा गोष्टी करा, तज्ज्ञ सांगतात…
neck fat be causing breathing problems
तुमच्या मानेच्या चरबीमुळे श्वासोच्छ्वास घेण्यात अडथळे येऊ शकतात? तज्ज्ञ काय सांगतात…
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Viral Video Shows Students Dance On Fevicoal Se Song
हे दिवस पुन्हा येणे नाही…! ‘फेव्हिकॉल से’ गाण्यावर विद्यार्थ्यांचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून जुन्या आठवणीत जाल रमून
L&T, Subramaniam , 90 hours work ,
काम महत्त्वाचेच, पण जगणे अधिक महत्त्वाचे…

दर अर्ध्या तासाने डेस्कवरून उठा –

वाढत्या वजनामुळे तुम्हाला त्रास होत असेल, तर ऑफिसमध्ये तासनतास सिस्टमवर काम करू नका, तर दर अर्ध्या तासाने सिस्टमवरून उठून चालत जा. अर्ध्या तासानंतर जर तुम्ही सिस्टीमवरून डोळे हटवले तर तुमच्या डोळ्यांनाही विश्रांती मिळेल आणि कंबरेची स्थितीही चांगली राहील.

मोठा श्वास घ्या आणि सोडा –

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर मोठा श्वास घ्या सोडा. श्वासोच्छ्वासामुळे ब्लड सर्कुलेशन सुरळीत होईल आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल.

स्ट्रेचिंग व्यायाम करा –

वजन कमी करायचे असेल तर ऑफिसमध्ये दर अर्ध्या तासानंतर खुर्चीवरून उठून स्ट्रेचिंग व्यायाम करा. स्ट्रेचिंग एक्सरसाइज म्हणजे तुम्ही खुर्चीवरून उठून शरीराच्या हालचाली करा.

चहा-कॉफीचे सेवन कमी करा –

 जर तुम्ही ऑफिसमध्ये बराच वेळ डेस्कवर काम करत असाल तर थकवा दूर करण्यासाठी चहा-कॉफीचे सेवन करू नका. चहा आणि कॉफीच्या अतिसेवनाने तुमचे वजन वाढू शकते. चॉय कॉफीऐवजी तुम्ही हेल्दी डिटॉक्स ड्रिंक प्या. डिटॉक्स ड्रिंक वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.

लंचमध्ये हेल्दी फूडचा समावेश करा-

 जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर लंचमध्ये हेल्दी फूडचा समावेश करा. तेलकट आणि जंक फूड टाळा. ऑफिसमध्ये जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने शरीरातील चरबी झपाट्याने वाढते.

Story img Loader