पोटाचा वाढता घेर ही सध्या अनेकांपुढील मोठी समस्या झाली आहे. ऑफिसमध्ये एकाच जागेवर बसून काम करावे लागत असल्यामुळे सध्या महिला आणि पुरुष अनेकांचा पोटाचा घेर वाढताना दिसतो. आता वाढलेली चरबी कमी करण्यासाठी काय उपाय करावा असा प्रश्न या लोकांपुढे असतो. मग कधी व्यायाम करुन तर कधी आहारातील बदलांनी हे साध्य होते. अंडी हे प्रोटीनचे उत्तम माध्यम असल्याने लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी अंडे खावे असे आहारतज्ज्ञ तसेच डॉक्टरांकडून सांगितले जाते. पण हेच अंडे पोटाचा घेर कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असते असे कोणी सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. अंड्याचे वेगवेगळे पदार्थ पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यास उपयुक्त ठरतात. अंड्यामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात. तसेच ते खाल्ल्यावर दिर्घकाळ पोट भरलेले राहते त्यामुळे लवकर भूक लागत नाही. त्यात आयर्न, पोटॅशियम, व्हीटॅमिन्स याचेही प्रमाण जास्त असल्याने अंडे आरोग्यासाठी चांगले असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा