Weight Loss Exercise: अतिरिक्त वजन हे कधीच फायद्याचे ठरत नाही. अति वजनासह जोडून अनेक आजार आपल्याला विळखा घालू शकतात. अतिवजनाच्या समस्येने ग्रस्त असल्यास अनेक जण मानसिक तणाव सुद्धा अनुभवतात पण अगदी अपवादात्मक स्थिती वगळता तुमचे वजन नियंत्रणात ठेवणे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. यासाठी नेहमीच जिममध्ये जाऊन घाम गाळण्याची किंवा भुकेने व्याकुळ करणाऱ्या डाएट प्लॅनची बंधने स्वतःच्या शरीराला लावणे गरजेचे नाही. उलट आहे तो आहार नियंत्रित ठेवून व रोज किमान व्यायाम करूनही आपण वजन कमी करू शकता. आज आपण जपानमधील एक अशीच घरगुती व प्रभावकारी व्यायामाची पद्धत पाहणार आहोत. जपानी तज्ज्ञांच्या मते या व्यायामाने आपण १० दिवसात सपाट पोट व ऍब्स मिळवू शकता.
जपानी टॉवेल व्यायाम म्हणजे काय?
जपानी रिफ्लेक्सोलॉजी व मसाज तज्ज्ञ, डॉ. तोशिकी फुकुत्सुदज़ी (Dr Toshiki Fukutsudzi) यांनी दशकापूर्वी जपानी टॉवेल व्यायाम पद्धत तयार केली होती. डॉक्टर तोशिकी यांनी दावा केला होता की या पद्धतीने ओटीपोटाचे फॅट्स कमी होण्यास मदत होते. तसेच तुमच्या शरीराला योग्य ढब देण्यासाठी सुद्धा याची मदत होते. पाठीच्या कण्याला मजबुती देण्यासाठी तसेच कंबरेच्या दुखण्यावर आराम देण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त ठरू शकतो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार जेव्हा ओटीपोटाच्या भागात फॅट्स जमा होतात तेव्हा त्याचा प्रभाव हा पेल्विक स्नायूंवर दिसून येतो या व्यायामाने आपण पेल्विक संबंधित तक्रारींवर समाधान मिळवू शकता.
जपानी टॉवेल व्यायाम कसा करावी?
स्टेप 1: पाठीवर झोपून आपले हात व पाय शरीरापासून थोड्या अंतरावर ठेवा
स्टेप 2: पाठीखाली एक टॉवेल ठेवायचा आहे. ज्या ठिकाणी बेंबी असते त्याचा अंदाज घेऊन पाठच्या बाजूला टॉवेल ठेवा.
स्टेप 3: यानंतर पाय एकमेकांना जोडून हात डोक्याच्या वर नमस्कार पोजिशन मध्ये ठेवावेर
स्टेप 4: पाय व हातांना किंचित ताण देताना आपला पार्श्वभाग थोडा वर उचलला जाईल असे पाहावे.
स्टेप 5: कमीत कमी पाच मिनिटासाठी ही पोझिशन कायम ठेवून मग हळूहळू शरीर पूर्व स्थितीत आणावे.
हे ही वाचा << उंचीनुसार तुमचे वजन परफेक्ट आहे का? इंच व किलोचं बेस्ट समीकरण जाणून घ्या, पाहा तक्ता
जपानी टॉवेल व्यायामाने वजन कमी होते का?
जपानी टॉवेल व्यायाम हा अनेक योगासनांशी मिळता जुळता प्रकार आहे. ज्या मंडळींना विशेषतः श्वासनाच्या तक्रारी आहेत तसेच थायरॉईडमुळे वजन वाढ जाणवत आहे त्यांना या व्यायामाचा लाभ होऊ शकतो. गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असल्यास हा व्यायाम फायदेशीर ठरू शकतो. डॉ. मिकी मेहता यांच्या माहितीनुसार जेव्हा तुम्ही शरीरात कॅलरीचे प्रमाण नियंत्रणात आणता तेव्हा वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे कॅलरीजमध्ये वर्गीकरण करणे सुरु करा. शरीराला उत्तम कॅलरीज देऊन पचनास कठीण अशा फॅट्सपासून लांब राहण्याचा मार्ग निवडा.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे वजन कमी करणे किंवा वाढवणे याबाबत वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल)