Parenting tips : सध्या लहान मुले सर्रास मोबाइल हाताळताना दिसून येतात. गेम्स, कार्टून्सकडे मुले लगेच आकर्षित होतात. अनेक पालकसुद्धा त्यांच्या मुलांना गेम्स आणि कार्टून्स बघण्याची परवानगी देतात. पण पालकांनो, याबरोबरच तुमच्या मुलांनी काही लघूपटसुद्धा आवर्जून बघायला पाहिजे. या लघूपटांमधून तुमच्या मुलांना काही चांगल्या गोष्टी शिकता येतील.
लहान मुलांनी पाहावे असे पाच लघूपट बालरोगतज्ज्ञ डॉ. अर्पित गुप्ता यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये सांगितले आहेत. आज आपण त्याविषयी जाणून घेऊ या.
डॉ. अर्पित गुप्ता त्यांच्या व्हिडीओमध्ये सांगतात की, हे पाच लघूपट तीन वर्षांपेक्षा मोठ्या मुलांनी बघायलाच पाहिजे.
१. अम्ब्रेला (Umbrella) – या लघूपटातून तुमची मुले दयाळूपणा शिकू शकतात.
२. होप (Hope) – या लघूपटातून तुमच्या मुलांना आयुष्यात कधी हार मानायची, हे शिकता येईल.
३. पायपर (Piper) – कोणत्याही भीतीवर कशी मात करायची, हे पायपर लघूपट शिकवतो.
४. पिप (Pip) – या लघूपटातून मुलांना आयुष्यात दृढनिश्चयी कसं बनायचं, हे शिकता येईल.
५. नापो (Napo) – कुटुंबाशी संबंधित हृदयस्पर्शी कथा या लघूपटात सांगितली आहे.
हे सर्व चित्रपट तुम्हाला यूट्यूबवर उपलब्ध आहे.
dr.arpitgupta11 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान लघूपट आहेत”, तर एका युजरने लिहिलेय, “हे पाचही लघूपट माझ्या मुलीला खूप आवडतात.” आणखी एका युजरने लिहिलेय, “सर, लहान मुलांसाठी काही हिंदी चित्रपट असेल तर तेसुद्धा सांगा.”