तुमच्या क्रेडीटच्या गोष्टींचे निरोगी संबंध असण्याने क्रेडिट स्कोअर तर मजबूत होतोच, शिवाय तुमच्या गरजेच्या वेळी उपयोगी पडण्यासाठी मजबूत अर्थपुरवठाही होऊ शकतो. क्रेडिट कार्ड्‌स, ऑनलाईन कर्जे आणि बिनाखर्चाचे ईएमआय यांच्यामुळे उधारीवर खरेदी करणे आता पूर्वी कधीही नव्हते एवढे सोपे झालेले आहे. या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मजबूत बँकिंग प्रणाली, मोबाईल वॉलेट्‌स आणि पेमेंट्‌स बँका हे सर्व तत्पर असतात, शिवाय पारंपरिक वित्तीय संस्था आहेतच. ही वेळ वैयक्तिक अर्थपुरवठ्याविषयी अधिक सतर्क राहण्याचीही आहे, अन्यथा ते नियंत्रणाबाहेर जाऊन तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकता. म्हणून नवीन घर घेणे असू द्या किंवा नवीन एलईडी टीव्ही खरेदी करणे असू द्या, पैशाच्या व्यवस्थापनाचे सुज्ञ मार्ग अवलंबून तुमच्या वैयक्तिक पतपात्रतेचा वापर करा.

तुमचा क्रेडिट स्कोअर काय आहे आणि त्यात सुधारणा कशी करायची आहे हे जाणून घ्या

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Use UPI without Bank account NPCI launches new feature UPI Circle for family members and friends
आता बँक खाते नसलेला व्यक्ती करू शकतो UPIचा वापर; NPCIने कुटुंबातील सदस्यांसाठी सुरू केलं UPI Circle, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल…
Impact of US Elections 2024 on Indian Stock Market
दुरावलेला खरेदी उत्साह बाजारात परत दिसेल?
Bigg Boss 18 hrithik roshan life coach arfeen khan Evicted from salman khan
Bigg Boss 18: हृतिक रोशनच्या लाइफ कोचला दाखवला ‘बिग बॉस’च्या घराबाहेरचा रस्ता, ‘हे’ सदस्य झाले सुरक्षित

क्रेडिट या शब्दाशी तुमचा वारंवार संबंध येत असल्याने त्याच्यासोबतच येणारे क्रेडिट स्कोअर या क्रेडिटच्या जगतातील महत्त्वाच्या शब्दाबद्दल तुम्ही ऐकत असाल. ३ अंकी संख्येने दर्शविला जात असलेला हा स्कोअर तुम्ही मागील काळात कशाप्रकारे तुमची पत राखलेली आहे त्यानुसार कर्ज देणाऱ्यांना तुमची पत दर्शवीत असतो. तुमची कर्जे वेळीच फेडा, तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो कमी ठेवा आणि कर्जाविषयी खूप चौकशा करू नका, म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर उच्च राहील. यामुळे तुम्ही कर्जपुरवठा करणाऱ्या संभाव्य संस्थांसाठी एक कर्जदार म्हणून अधिक विश्वासपात्र ठरता, ज्यामुळे तुम्हाला अधिक स्पर्धात्मक व्याजदराने मोठे कर्ज मिळू शकते. अशा प्रकारे हे अनिवार्य आहे की, तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर वेळोवेळी तपासून पाहावा. तुमचा क्रेडिट रिपोर्ट वर्षातून एकदा तपासून पाहिल्याने तुम्हाला कोणत्याही चुका शोधून काढणे शक्य होते. यामुळे तुमचा स्कोअर तात्काळ वर जातो, त्यामुळे तुम्हाला प्रवास करण्यासाठी किंवा सणासुदीच्या दिवसात घरखर्च भागविण्यासाठी वैयक्तिक कर्ज मिळू शकते.

कर्जाविषयी आणि क्रेडिटकार्ड्‌सचा उपयोग परिणामकारकपणे कसा करावा हे शिकून घ्या

कर्ज म्हणजे आता काही कोणी मागेपुढे पाहत नाही, कारण त्यामुळे तुम्हाला अचानक उद्भवलेले खर्च सहजपणे भागवता येतात. खरे म्हणजे, आज ऑनलाईन कर्जे अधिकाधिक प्रमाणात आढळून येत आहेत, ज्यात सोपा ऑनलाईन अर्ज भरावयाचा असतो आणि तात्काळ निधी पुरवला जातो. तुम्ही तुमचे काम किंवा वैयक्तिक आयुष्य यांमध्ये नव्याने उभारी आणू शकत असलात, तरी ईएमआय कॅलक्युलेटर्सकडे लक्ष असू द्या आणि परफेडीची योजना आधीच आखा.
तुमच्या कर्जाची परतफेड वेळेवर करून तुमची पत निर्माण करा, ज्यामुळे तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा अधिक कर्ज प्राप्त करू शकाल. तुम्ही कर्ज घेण्यासाठी पात्र आहात किंवा काय हे न तपासता अनेक ठिकाणी चौकशी करणे टाळा आणि तुमच्या वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डांचा गठ्ठा बाळगण्याऐवजी २-३ उपयुक्त कार्डस्‌ वापरा. रिवॉर्ड तपासून पहा आणि तुम्हाला ज्या कार्डमधून तुमच्या जीवनशैलीनुसार खरोखर लाभ मिळत असेल त्यांची निवड करा. शिवाय, तुम्ही तुमचे क्रेडिट लिमिट दर महिन्याला न संपवण्याची काळजी घ्या, पण त्याचा वापर सारासार विचार करून करा. यामुळेही तुमचा क्रेडिट स्कोअर वाढलेला दिसेल.

तुमच्या खर्च करण्याच्या पॅटर्नचे विश्लेषण करा आणि अधिक बचत करा

जेव्हा तुम्हाला तुमची आर्थिक घडी बसवायची असते तेव्हा तुम्ही तुमच्या मासिक बजेटच्या बाहेर खर्च होऊ न देणे अनिवार्य असते. तुमच्या खर्चावरील मर्यादा निश्चित केल्याने तुम्ही तुमची बचत करावयाची रक्कम खर्च करणार नाही आणि तरीही जादा खर्च न करता स्वत:च्या गरजा भागवून समाधानी ठेवण्यासाठी चांगले पर्याय शोधून काढाल. प्रत्येक महिन्यात काही तास बाजूला काढून तुमच्या बजेटचे पुनरावलोकन केल्याने तुम्ही तुमच्या ट्रॅकवर राहण्यास मदत होईल. तुमचे बजेट नियमितपणे बिले आणि इतर खर्च यांच्यासह अद्ययावत करा, ज्यामुळे तुमच्या हिशेबातून काहीही सुटणार नाही आणि प्रलंबित खर्च भागविण्यासाठी तुम्ही किती पैसे खर्च करू शकता हे तुम्हाला कळेल.

तुम्हाला जेव्हा तुमचे उद्दिष्ट गाठायचे असते, मग ते सुट्टी घालवणे असो वा नवीन कार खरेदी करणे असो, तेव्हा अशा वेळी कोणतेही अनावश्यक खर्च न करणेच बरे. ह्याचाच अर्थ असा आहे की, तुम्ही नवीन कर्ज घेणे किंवा तुमच्या क्रेडिट कार्डचा अतिरेकी वापर करणे थांबवले पाहिजे. तुमच्या क्रेडिट कार्डच्या उपयोगावर मर्यादा घातल्यानेही तुम्हाला मोहात पाडणारे खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होतात. तुमच्या सध्याच्या उत्पन्नाची पातळी आणि विद्यमान जबाबदाऱ्या यांच्यावर आधारित तुम्ही जास्तीचा खर्च करू शकता किंवा काय ह्याचे आकलन तुम्हाला करता आलेच पाहिजे.

एकरकमी भरणा करण्यापेक्षा ईएमआय भरा

ई-कॉमर्स वेबसाईट असो वा रिटेल आऊटलेट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून असो, आजकाल तुम्ही जवळजवळ प्रत्येक गोष्ट ईएमआयच्या माध्यमातून खरेदी करू शकता. यामुळे तुम्हाला त्यासोबत नियमित पेमेंट करता येतेच, शिवाय तुमचा क्रेडिट स्कोअरही वाढवता येतो आणि त्यामुळे तुमचे बजेट ट्रॅकवर राहते. म्हणून प्रत्येक मोठ्या खरेदीसाठी, मग ती वार्षिक जिम मेंबरशिप असो वा सोन्याचे दागिने किंवा प्रवासाची तिकिटे असू द्या, त्यांचे पैसे सुलभ हप्त्यांनी भरा.

तुमच्या बचतीसाठी आणि गुंतवणुकीसाठी नियमितपणे पैसे भरा आणि चक्रवाढीचा लाभ घ्या

तुम्ही दर महिन्याला तुमच्या बचत खात्यात पैसे जमा करण्याची सवय अंगी बाणवलीच पाहिजे. तुमच्या खात्यातून एक ठरावीक रक्कम आपोआप हस्तांतरित करण्याची विनंती तुम्ही तुमच्या बँकेला करू शकता. दृष्टीच्या पलीकडे, मनाच्या पलीकडे, हा नियम येथे तुमच्या बाजूने काम करतो. अशा बचतींमुळे तुम्ही माहितीपूर्ण गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकता, ज्यामुळे मुदतठेवीसारखा चक्रवाढीचा फायदा तुम्हाला मिळू शकेल. भविष्यासाठी निधी उभारण्यासाठी तुम्ही एसआयपीज्‌, इक्विटी आणि इतर इ्न्स्ट्रुमेंट्‌समध्ये गुंतवणूक करण्याच्या तुमच्या जोखमीचे विश्लेषण करू शकता.

तुमच्या दैनंदिन खर्चासाठी मोठ्या उद्दिष्टांसाठी आधीच नियोजन केल्याने तुमच्या पैशाचे व्यवस्थापन करणे सोपे जाते. अशी पावले उचलल्याने तुम्ही तुमच्या आर्थिक व्यवहारांचा लगाम तुमच्या हाती ठेवू शकता, उत्तम क्रेडिट राखण्याची सवय लावून घेऊ शकता आणि तुम्हाला हव्या त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकता, मग ते तुमच्या बँक खात्यात १ कोटी रुपये शिल्लक पाहणे असो वा ग्रेट बॅरिअर रीफमध्ये डायव्हिंग करणे असो.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार