गृहकर्ज, कारलोन यांबरोबरच सध्या अनेक जण पर्सनल लोनही घेताना दिसतात. विविध कारणांसाठी हे कर्ज घेतले जात असल्याने तुम्हाला निकडीच्या वेळी ते तुम्हाला आर्थिक बळ देते. तरीही, कर्ज घेण्यापूर्वी त्याच्या अटी व नियम पडताळून पाहणे आवश्यक आहे. व्याजदर, कर्जाची मुदत, उशीरा परतफेड केल्यास दंड आणि इतर बरेच काही. या कर्जाचा चांगला फायदा मिळवण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा.

अर्ज करण्यापूर्वी क्रेडिट स्कोअर तपासा

Nirmala Sitharaman said Rs 14 131 crore recovered from Vijay Mallyas property sale
राव की रंक?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Supreme Court decision regarding credit card payments print eco news
क्रेडिट कार्ड देयकाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; थकबाकीचा भरणा उशिराने केल्यास वार्षिक ३० टक्के व्याजदराची मर्यादा रद्दबातल
Mango , Amaravati Mango, Vidarbha Mango,
यंदा आमरस जोरात, दरही कमी होणार; कडाक्याच्या थंडीमुळे आंबेमोहोर…
Income Tax Return, Income Tax, Tax, loksatta news,
इन्कम टॅक्स रिटर्न अजूनही दाखल करता येईल?
Chief Minister Devendra Fadnavis asserts that there should be a time-bound evaluation of the performance of ministers print politics news
मंत्र्यांच्या कामगिरीचे कालबद्ध मूल्यमापन,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; मंत्र्यांचे खातेवाटप दोन दिवसांमध्ये
Foreign investments from the capital market Decline value of the US dollar
ढासळत्या रुपयातून चलन गंगाजळीला खड्डा; उच्चांकी पातळीपासून ५० अब्ज डॉलरची घट
Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

कर्ज देण्याआधी वित्तीय संस्था तुमचा क्रेडिट स्कोअर पाहून तुमची पात्रता ठरवतात. अर्जावर विचार करण्यापूर्वी ते अर्जदाराची मिळकत पाहतात. क्रेडिट स्कोअर कमी असल्यामुळे अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता असते. तुमचा क्रेडिट स्कोअर दर महिन्याला बदलत असतो, त्यामुळे कर्जासाठी अर्ज करण्याआधी तुम्हीच तो तपासावा. गुगलवर “free credit report” शोधा. यामुळे तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर दोन मिनिटांत विनामूल्य मिळवता येतो.

व्याजाचा दर आणि मुदत

गृह कर्जासारख्या इतर कर्जांपेक्षा पर्सनल लोनवरील व्याजाचा दर अधिक असतो. याचे मुख्य कारण म्हणजे हे कर्ज बहुतांश वेळा जामीनाशिवाय दिले जाते. त्यामुळेच याला असुरक्षित कर्ज म्हटले जाते कारण कर्जदाराकडून कुठल्याही प्रकारचे जामीन घेतले जात नाही. या कर्जासाठी व्याजाचा दर बँकांकडून ११ ते १६ टक्के असतो, तर इतर वित्तीय संस्था यासाठी अधिक दराने व्याज आकारतात. म्हणूनच, व्याजाचा दर पडताळून तर पाहाच, तसेच हा दर परिवर्तनशील असल्यामुळे यात २ ते ३ टक्के इतका बदल घडू शकतो हेही लक्षात ठेवा. व्याजाचा दर आणि मुदत या दोन कारणांचा प्रभाव तुमच्या ईएमआयच्या आकड्यावर पडतो. मुदत अधिक असल्यास ईएमआय कमी असते; पण मुदत कमी असल्यास एकूण व्याज कमी द्यावे लागते. क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास तुम्हाला कमी व्याज दर आकारला जाऊ शकतो.

प्रोसेसिंग फी

बहुतांश वेळा आपण अशा खर्चांकडे दुर्लक्ष करतो कारण हा आकडा आपल्याला लहान वाटतो. पण हा खर्च कर्जाच्या आकड्याप्रमाणे वाढत जाऊ शकतो. प्रोसेसिंग फी सोबतच इतर खर्च जसे जीएसटी, एकदाच आकारली जाणारी फी आणि इतर खर्चांकडेही लक्ष ठेवा.

उशीरा परतफेड केल्याने होणारा दंड

पर्सनल लोनच्या बाबतीत उशीरा केलेली परतफेड किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये बँलन्स कमी असल्यामुळे ईसीएस नामंजूर होणे अशा कारणांमुळे तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. काही वित्तीय संस्था आणि बँका परतफेडीस उशीर झाल्यावर ईएमआयच्या ५ ते १० टक्क्यांपर्यंतही दंड आकारला जातो. तसेच ईसीएस नामंजूर झाल्यावर तुमच्या बँकेकडूनही तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो.

मुदतीआधी कर्ज पूर्ण करण्याची फी

बहुतांश लोक आर्थिक निकडीच्या वेळी पर्सनल लोन घेतात आणि त्याचा अर्थ असा असू शकतो की कर्जाच्या मुदतीत ते आगाऊ रक्कम भरून कर्ज संपूर्णपणे किंवा अंशतः पूर्ण करू शकतात. म्हणूनच हे तपासून घ्या की कर्जाच्या अटींमध्ये संपूर्णपणे किंवा अंशतः कर्ज पूर्ण करण्यासाठी काय नियम आहेत. काही वित्तीय संस्था अशा वेळेस काही फी आकारतात. इतर संस्था अशा परतफेडीस परवानगी देतात, पण त्यासाठी तुम्हाला अधिक व्याज द्यावे लागू शकते.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार

Story img Loader