Potato on face: बटाट्यामध्ये अनेक प्रकारची संयुगे असतात जी त्वचेसाठी फायदेशीर मानली जातात. बटाट्याच्या रसामध्ये अनेक प्रकारचे एन्झाइम्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी बटाट्याचा वापर कसा करू शकता आणि का करू शकता.

चेहऱ्यासाठी बटाटा वापरण्याचे फायदे (Uses of potato on face)

उजळपणासाठी बटाटा कसा वापरावा How to use potato on face for tan removal
टॅनिंगसाठी तुम्ही बटाट्याचा रस मोठ्या प्रमाणात वापरू शकता. हे त्वचेच्या पेशींमध्ये प्रवेश करून क्लिंजिंग एजंटसारखे कार्य करते आणि त्यातील पोटॅशियम टॅनिंग कमी करण्यास मदत करते. त्यामुळे टॅनिंगसाठी बटाट्याचा रस कॉफी पावडर आणि लिंबाचा रस मिसळून लावा.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
Dragon fruit benefits for skin and hair
त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
Benefits of lemon water Is Warm Lemon Water On An Empty Stomach Good for You? Expert Says This know more
Lemon water:सकाळी उठून लिंबू पाणी पिण्याची ७ कारणं, आरोग्यासाठी अप्रतिम फायदे वाचून व्हाल थक्क
onion prices loksatta news
कांदा स्वस्त; गृहिणींना दिलासा, आठवडाभरात किलोमागे २० ते २५ रुपयांनी घट
Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार

सुरकुत्या कमी करण्यासाठी बटाटा कसा वापरावा (How to use potato on face for wrinkles)

सुरकुत्यासाठी बटाट्याचा वापर अनेक प्रकारे फायदेशीर आहे. सर्वप्रथम, बटाट्याचा रस सुरकुत्या घट्ट करतो आणि त्वचेच्या पेशी निरोगी ठेवतो. त्यामुळे चेहऱ्यावर आर्द्रता आणि हायड्रेशन टिकवण्यासाठी कोरफड किंवा गुलाबपाणी बटाट्याच्या रसात मिसळून लावा.

चेहऱ्यावरील काळ्या वर्तुळासाठी बटाटा कसा वापरवा (How to use potato on face for dark circles)

चेहऱ्यावरील काळ्या वर्तुळासाठी, बटाट्याच्या रसात व्हिटॅमिन ई मिसळा. त्यामुळे तुम्हाला फक्त बटाट्याचा रस काढायचा आहे आणि त्यात व्हिटॅमिन ई टाकायचे आहे. नंतर दोन्ही मिक्स करून डोळ्याभोवती लावा. हलक्या हातांनी मसाज केल्याने काळी वर्तुळे कमी होऊ लागतील.

काळ्या डागांसाठी कसा वापरावा बटाटा (How to use potato on face for dark spots)

काळ्या डागांवर बटाट्याचा वापर खूप फायदेशीर आहे. यामुळे मुरुमांचे डाग कमी होतात आणि त्वचेतील मृत पेशी स्वच्छ होतात आणि त्वचेतील नवीन पेशींची वाढ वाढते. यामुळे काळे डाग कमी होतात. त्यामुळे तुम्हाला फक्त बटाट्याच्या रसात दूध आणि थोडी हळद मिसळून काळ्या डागांवर लावायचे आहे.

पुरळ घालवण्यासाठी बटाटा कसा वापरावा (How to use potato on face for pimples)


बटाट्याच्या रसाचा वापर पिंपल्ससाठी खूप फायदेशीर आहे. हे अँटीबॅक्टीरियल पद्धतीने काम करू शकते. यासाठी बटाट्याच्या रसात लिंबाचा रस मिसळून चेहऱ्याला लावा. १५ ते २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. त्याचप्रमाणे तुम्ही त्वचेसाठी कोरफडीचाही वापर करू शकता.

Story img Loader