एखादा दिवस झोपेतून उठायचा किंवा काम करायचा कंटाळा येत असेल तर ते स्वाभाविक आहे. मात्र दररोज आळस येत असेल तर? जर एखाद्या व्यक्तीला रोज आळस येत असेल, तसेच त्याचे संपूर्ण लाइफस्टाइलच आळसाने भरलेले असेल तर याला त्याची राशी जबाबदार असल्याचे मानले जाते. अशा राशींबद्दल आज आपण जाणून घेऊया.
(इम्युनिटी वाढवण्यात मदत करतो आवळा, फक्त खाताना ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा)
या राशीचे लोक आळशी असल्याचे मानले जाते
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांना पार्ट्या करणे आवडते, मात्र त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी सांभाळणे आवडत नाही.
वृषभ राशी
या राशीच्या लोकांना शांत ठिकाणी आनंद वाटतो. त्यांना टीव्हीवर कार्यक्रम बघणे आवडते, मात्र त्यांना खूप परिश्रम घेणे आवडत नाही. मात्र, ते जबाबदारी मिळाल्यास ते निभवतात, असे मानले जाते.
(Clothes Sewing : आता ‘या’ सोप्या पद्धतीने शिवा आपले आवडते कपडे, पाहा हा व्हिडिओ)
तूळ राशी
तूळ राशीचे लोक मेहनती नसतात. त्यांना प्रत्येक गोष्ट सोप्या पद्धतीने करणे आवडते. परीश्रमाच्या बाबतीत त्यांना ताण येतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
धनू राशी
चांगली वेळ घालवण्यासाठी या राशीच्या लोकांना शहराबाहेर जाणे आवडत नाही आणि त्यांना आळस येतो. या राशीचे लोक त्यांच्या स्वतंत्र्याला महत्व देतात, असे मानले जाते.
(तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे आश्चर्यकारक फायदे, पण ‘या’ गोष्टी टाळा, अन्यथा..)
मीन राशी
या राशीचे लोक अत्यंत सर्जनशील असतात आणि कलाकार असतात, परंतु त्यांना कठोर परिश्रम करणे आवडत नाही आणि त्यांना उशीर करण्याची सवय असल्याचे मानले जाते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)