वयाचा आरोग्यावरही परिणाम होतो. ५० वर्षांवरील अनेक लोकांना हृदय विकार आणि मुत्रपिंडाचे आजार होतात. यापासून बचाव करण्यासाठी आपल्या जीवनशैली आणि आहारामध्ये बदल करणे गरजेचे आहे. ५० वर्षांवरील व्यक्तींना निरोगी आयुष्य मिळण्यासाठी बेस्ट लाईफने एक सल्ला दिला आहे. जर तुम्ही ५० ते ८० वर्षांपर्यंत रोज आपला रक्तदाब तपासत राहिले तर ते अनेक आरोग्य समस्यांपासून तुमचा बचाव करण्यात मदत करेल, असे बेस्ट लाईफचे म्हणणे आहे.

रक्तदाब धोकादायक ठरू शकतो

home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम

उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन हे शरिरासाठी धोकादायक ठरू शकते. याची लक्षणे सहजासहजी दिसत नाही. पण तुम्ही उच्च रक्तदाबाच्या समस्येने ग्रस्त असार तर तुम्हाला इतर अनेक आजारांना तोंड द्यावे लागू शकते. उच्च रक्तदाब डिमेन्शिया, हृदयाचे विकार, मुत्रपिंडाला नुकसान करू शकते, तसेच डोळ्यांची दृष्टी जाणे, लैंगिक समस्या आदीचे कारण ठरू शकते.

(मुलांची उंची वाढवण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश, फरक दिसून येईल)

उच्च रक्तदाब टाळण्यासाठी हे करा

५० ते ८० वर्षे वय असलेल्या लोकांनी रक्तदाब तपासण्याची सवय लावून घेतली पाहिजे. या लोकांनी रोज रक्तदाब तपासला पाहिजे. याने तुमचा रक्तदाब नेहमी किती असतो हे कळेल. वाढ दिसून आल्यास ते कधीपासून वाढलेले आहे याची माहिती मिळते. या माहितीने डॉक्टरला देखील योग्य उपचार सुचवणे सोपी जाते. संशोधनांमध्ये केवळ ४८ टक्के लोक रोज आपला रक्तदाब तपासात असल्याचे समोर आले आहे. तसेच फार कमी लोक याबाबत डॉक्टरला माहिती देतात. परिणामी, उच्च रक्तदाब वाढल्यानंतर इतर समस्या निर्माण होतात.

या गोष्टी ध्यानात ठेवा

  • अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, सकाळी आणि रात्री आपला रक्तदाब तपासा आणि त्याबाबत लिहून ठेवा.
  • जमा केलीली माहिती नंतर डॉक्टरला दाखवता येईल.
  • एकदा रक्तदाब तपासल्यानंतर परत दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा तपासा, दोन्ही तपासणीत १ मिनिटांचा अंतर ठेवा. योग्य रीडिंग मिळाल्यावर तिची नोंद करा.
  • रक्तदाब चेक करण्याच्या ५ मिनिटांपूर्वी लघवी करा. त्यानंतर रक्तदाब तपासा.
  • रक्तदाब तपासण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत धुम्रपान, मद्यपान, व्यायाम करू नका.
  • चांगले बसा आणि नंतरच रक्तदाब तपासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनचा वापर करा.

(कोलेस्टेरॉल कमी करू शकते लिंबू पाणी, जेवल्यानंतर प्यायल्याने मिळतात ‘हे’ मोठे फायदे)

उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी हे करा

  • सोडियमचे सेवन कमी करा.
  • एका जागेवर दिवसभर बसू नका.
  • नेहमी व्यायाम करा.
  • ताण, धुम्रपान टाळा.
  • डॉक्टरांचा सल्ला घ्या.