Oppo कंपनीने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Oppo A52 लॉन्च केला आहे. कंपनीने सोमवारी हा फोन चीनमध्ये लॉन्च केला. आपल्या अधिकृत वेबसाईटवरही कंपनीने हा फोन उपलब्ध केला. दोन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या फोनच्या मागील बाजूला चार कॅमेरे आहेत. यातील सिंगल सेल्फी कॅमेरा होल-पंच डिस्प्लेमध्ये सेट करण्यात आलाय. 5,000 एमएएच क्षमतेची पावरफुल बॅटरी असलेल्या या फोनमध्ये हायपरबूस्ट टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Oppo A52 स्पेसिफिकेशन्स – (Oppo A52 specification)
ओप्पो ए52 Android 10 वर आधारित ColourOS 7.1 वर कार्यरत असेल. यामध्ये 6.5 इंच (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले असून ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 665 चिपसेट आहे. तर, 8 जीबी LPDDR4x रॅम असलेल्या या फोनमध्ये मागील बाजूला क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यात प्रायमरी कॅमेऱ्यात 12-मेगापिक्सल सेंसर आणि सेकंडरीमध्ये 8-मेगापिक्सल सेंसरचा समावेश आहे. फ्लॅशसह हे चार कॅमेरे आयताकार कॅमेरा मॉड्यूलमध्ये सेट करण्यात आले आहेत. अन्य दोन कॅमेरे 2-मेगापिक्सलचे सेंसर आहेत. तर फ्रंटमध्ये एक 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये वाय-फाय, एलटीई, ब्लूटूथ, एक 3.5 मिलिमीटर हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी युएसबी टाइप-सी पोर्ट आहेत. याशिवाय, 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी यात आहे. 192 ग्रॅम वजन असलेला या फोनला साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरही आहे, म्हणजे सेंसर पावर बटणमध्ये फिट करण्यात आले आहे.

Oppo A52 किंमत – price -(Oppo A52 price)
ओप्पो ए52 चीनमध्ये ओप्पोच्या वेबसाइटवर 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. चीनमध्ये या फोनची किंमत 1,599 चीनी युआन (जवळपास 17,300 रुपये) आहे. हा फोन ब्लॅक आणि ब्लू अशा दोन रंगांमध्ये लाँच करण्यात आलाय. भारतात हा फोन कधी लाँच होईल याबाबत मात्र कंपनीने माहिती दिलेली नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5000mah battery oppo a52 with quad rear cameras 8gb ram launched know price specifications and all other details sas