नुकतेच निस्सान इंडिया व सेव्हलाइफ फाऊंडेशन यांनी सादर केलेल्या ‘भारतातील मागील आसनांवरील सीटबेल्ट वापर आणि चाइल्ड रोड सेफ्टी’ मधील अहवालाने एक चिंताजनक बाबसमोर आणली. ती म्हणजे भारतीय लोक आपल्या व आपल्या मुलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, जयपूर, कोलकाता आणि लखनऊ
याप्रमुख शहरांमध्ये करण्यात आलेल्या निरीक्षणात्मक सर्वेक्षणामधून ही बाब निश्चित झाली. या सर्वेक्षणातून निदर्शनास आले ९० टक्क्यांहून अधिक प्रतिसादकांनी मागील आसनांवरील सीटबेल्टचा वापर करत नसल्याचे सांगितले, ज्यामुळे ते आपणहून आपला जीव धोक्यात टाकतात. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, जयपूर, कोलकाता आणि लखनऊ या प्रमुख शहरांमध्ये करण्यात आलेल्या निरीक्षणात्मक सर्वेक्षणामधून ही बाब निश्चित झाली. या सर्वेक्षणातून निदर्शनास आले की, ९८ टक्के प्रतिसादक मागील आसनांवरील सीट-बेल्टचा वापर करत नाहीत. ७० टक्क्यांहूनअधिक लोकांना मागील आसनांवरील सीट-बेल्ट्स वापरण्याचे महत्त्व माहित असताना देखील मागील आसनांवरील सीट बेल्ट्सचा वापर खूपच कमी आहे. नुकतेच या अहवालाचे अनावरण रस्ते वाहतूक आणि महामार्गांचे माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.मुंबईमध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात चारचाकी वापरणाऱ्यांपैकी ३४ टक्के मुंबईकरांना मागील आसनांवरील सीटबेल्ट कसा बांधावा हेच माहित नसल्याचे निदर्शनास आले आहे.
चारचाकी वापरकर्त्यांची जागरुकता, वागणूक, वृत्ती आणि सवयी, सीट बेल्टचा वापर किंवा वापर नकरणे या बाबी जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण मुंबईत करण्यात आले. त्यामध्ये २०३ व्यक्तींनी सहभाग नोंदविला. तर मागील आसनांवरील सीट बेल्ट बांधणे बंधनकारक करणाऱ्या कडक कायदयाची गरज असल्याचे मत यावेळी ९०% व्यक्तींनी नोंदविले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा