Baby Names Born In Ganeshotsav : आजपासून देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. गणेशोत्सवात दहा दिवस गणपतीची आराधना केली जाते. हे दहा दिवस अत्यंत पवित्र मानली जातात. या दिवसांमध्ये जर तुमच्या घरी बाळाचा जन्म झाला तर त्याचे नाव काय ठेवावे, या विषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत..
नाव ही व्यक्तीची ओळख असते. लहानपणी ठेवलेले नाव पुढे आयुष्यात कधीच बदलत नाही. त्यामुळे गणेशोत्सवात जन्मलेल्या बाळासाठी आज आपण काही हटके आणि सुंदर नावे जाणून घेऊ या.
विघ्नराज – सर्व संकटाचे स्वामी
विघ्नहर्ता असलेला गणपती हा सर्व संकटाचा स्वामी असतो. त्यामुळे गणेशोत्सवात जर तुमच्या घरी बाळ जन्माला आले असेल तर तुम्ही त्याचे विघ्नराज हे नाव ठेवू शकता.
हेही वाचा : हेही वाचा : फेसबुक, इन्स्टाग्रामवर अनोळखी व्यक्तींबरोबर मैत्री करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी….
अवनीश- महान देवता
गणपतीला अवनीश या नावाने सुद्धा ओळखले जाते. जगातील सर्वात महान देवता म्हणून गणपतीला ओळखले जाते. तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाचे नाव अवनीश ठेवू शकता.
प्रगनेश – अनेक गुणांनी परिपूर्ण
जर तुम्हाला तुमच्या बाळाचे हटके नाव ठेवायचे असेल तर तुम्ही प्रगनेश नाव ठेवू शकता. प्रगनेश या शब्दाचा अर्थ होतो की विविध गुणांनी परिपूर्ण असणे. हे नाव खूप सुंदर आहे.
शुभान – शुभ
जर तुमच्या बाळाचा जन्म गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला असेल तर तुम्ही त्याचे नाव शुभान ठेवू शकता. शुभान या शब्दाचा अर्थ होतो शुभ. शुभ दिवशी जन्मलेल्या बाळासाठी शुभान हे नाव परफेक्ट आहे.
औदार्य – परोपकारी
औदार्य म्हणजे परोपकारी आणि उदार स्वभाव. गणपतीचा सुद्धा असाच परोपकारी आणि उदार स्वभाव असतो त्यामुळे गणोत्सवात जन्मलेल्या बाळाचे नाव तुम्ही औदार्य ठेवू शकता.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)