पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू असतो. जर पावसाळ्यात तुमच्या घरी बाळ जन्माला आलं असेल तर तुम्ही या बाळाचे नाव ऋतूप्रमाणे ठेवू शकता.
लहानपणी ठेवलेले नाव ही माणसाची ओळख असते. एकदा ठेवलेले माणसाचे नाव आयुष्यात कधीच बदलत नाही. अशात पावसाळ्यात जर बाळ जन्माला आलं असेल तर तुम्ही काही हटके नाव ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला एकापेक्षा एक चांगली नावे सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलांची नावं

मेघ

जर पावसाळ्यात तुमच्या घरी मुलगा जन्माला आला तर तुम्ही त्याचे नाव मेघ ठेऊ शकता. मेघ या शब्दाचा अर्थ आहे ढग. मेघ हे अगदी छोटे आणि सुंदर नाव आहे.

वर्शल

पावसाच्या वातावरणात जर तुमच्या घरी मुलाने जन्म घेतला तर त्याचे नाव तुम्ही वर्शल ठेवू शकता. वर्शल म्हणजे वर्षा. हे खूप सुंदर नाव आहे.

हेही वाचा : यंदा श्रावणात आठ सोमवार? आठही सोमवारी उपवास करायचा का? जाणून घ्या

श्रावण

पावसाळा म्हटलं की श्रावण महिना असतो. अशात श्रावण महिन्यात तुमच्याकडे मुलगा जन्माला आला असेल तर त्याचे नाव तुम्ही श्रावण ठेवू शकता.

मुकिल

मुकिल हे नाव सुद्धा खूप सुंदर आहे. मुकिल या शब्दाचा अर्थ होतो ढग. तुम्ही हे तीन अक्षराचे नाव सुद्धा ठेवू शकता.

इंद्रनील

पावसाळ्यात अनेकदा आकाशात इंद्रधनुष्याचे दर्शन होते. यावरुन तुम्ही तुमच्या मुलाचे इंद्रनील हे खास नाव ठेवू शकता. याशिवाय या नावाचा अर्थ इंद्र (इंद्रदेव) आणि नील (शिवजी) असाही होतो.

हेही वाचा : Chanakya Niti : गाढवापासून शिकाव्यात या तीन गोष्टी, जीवनात अयशस्वी कधीच होणार नाही; वाचा, चाणक्य काय सांगतात?

मुलींची नावं

श्रावणी

ज्याप्रमाणे श्रावण महिन्यात जन्माला आलेल्या मुलाचे नाव श्रावण ठेवू शकतो त्याप्रमाणे मुलीचे नाव तुम्ही श्रावणी ठेवू शकता.

मेघना

मेघना या शब्दाचा अर्थ होतो ढगं. तुम्ही हे सुंदर नाव तुमच्या मुलीचे ठेवू शकता.

सरी

जर तुमच्या घरी छोट्या चिमुकलीने जन्म घेतला असेल तर तुम्ही तिचे नाव सरी ठेवू शकता.

हेही वाचा : Swapna Shastra : तुम्ही स्वप्नात कधी स्वत:ला नाचताना बघितले आहे का? जाणून घ्या याचा खरा अर्थ ….

वृष्टी

वृष्टी म्हणजे पाऊस. पावसाळ्यात जन्मलेल्या मुलीचे नाव तुम्ही वृष्टी सुद्धा ठेवू शकता.

अमाया

अमाया शब्दाचा अर्थ रात्रीचा पाऊस असा होतो. तुम्ही हे सुंदर नाव मुलीचे ठेवू शकता.

केया

केया हे एक पावसाळी फुल आहे. तुम्ही हे नाव पावसाळ्यात जन्मलेल्या मुलीचे ठेवू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A boy or girl names born in monsoon rainy season unique meaningful names of baby on rainy season shravan month monsoon ndj
Show comments