आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याचा वापर करून आपण स्वतःला निरोगी ठेवू शकतो. अनेक वेळा आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या त्या वस्तूंच्या फायद्यांबद्दल आपल्याला अजिबात माहीतच नसते. अशीच एक अतिशय उपयुक्त गोष्ट म्हणजे काळे मीठ. इतकंच नाही तर काळ्या मिठाचा उपाय लठ्ठपणा दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
काळ्या मिठामध्ये ८० प्रकारची खनिजे आणि असे अनेक नैसर्गिक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. तुम्ही जर रोज सकाळी कोमट पाण्यात काळे मीठ मिसळून प्यायल्याने अनियंत्रित रक्तदाब आणि साखरेसह अनेक आजार दूर होतील.
कोमट पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये एक तृतीयांश चमचे काळे मीठ मिसळा व ग्लासावर झाकण ठेवून काही तास तसंच राहू द्या. थोड्या वेळाने त्या पाण्यात थोडे अधिक काळे मीठ टाका. तुम्हाला दिसेल की नंतर तुम्ही टाकलेले काळे मीठ पाण्यात विरघळणार नाही. जर ते पाण्यात विरघळत नसेल तर तुम्ही बनवलेले पाणी पिण्यासाठी तयार आहे. तर काळ्या मिठाचे तुमच्या आहारात सेवन केल्यास आणखीन कोणते फायदे होऊ शकतात, ते जाणून घेऊयात…..
हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर
आपल्यापैकी अनेकांना माहित नाही की आपले शरीर आपल्या हाडांमधून कॅल्शियम घेते, ज्यामुळे आपली हाडे कमकुवत होतात. काळ्या मिठाचे पाणी किंवा काळ्या मिठाचे आहारात सेवन केल्यास हाडे कमकुवत होत नाही व हाडांना नवीन ताकद देते.
लठ्ठपणा आटोक्यात आणण्यास मदत होते
काळे मीठ आणि कोमट पाण्याच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील पेशींना पोषण मिळते, ज्यामुळे लठ्ठपणा नियंत्रित राहण्यास मदत होते.
त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळेल
काळ्या मिठात असलेले क्रोमियम मुरुमांशी लढते आणि सल्फर त्वचा स्वच्छ आणि कोमल बनवते. त्यामुळे काळ्या मिठाच्या आणि कोमट पाण्याच्या नियमित सेवनाने तुम्हाला एक्जिमा आणि रॅशेसच्या समस्येपासूनही सुटका मिळते.
पचन सुधारण्यास मदत करते
मीठ पाणी तोंडातील लाळ ग्रंथी सक्रिय करण्यास मदत करते. ही ग्रंथी अन्न पचवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच या मिठाचे पाणी तुमच्या शरीरातील हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि प्रथिने पचवणारे एंजाइम उत्तेजित करण्यास देखील मदत करते. यामुळे खाल्लेले अन्न सहज पचते.
याशिवाय, आतड्यांसंबंधी मार्ग आणि यकृतातील एंजाइम देखील उत्तेजित होण्यास मदत करतात, ज्यामुळे अन्न पचणे सोपे होते. तसेच अॅसिडिटीपासूनही आराम मिळतो.
झोप येण्यासाठीही याचा फायदा होतो
काळ्या मिठात असलेली खनिजे आपल्या मज्जासंस्थेला शांत करतात. हे कॉर्टिसोल आणि एड्रेनालाईन सारख्या दोन धोकादायक तणाव संप्रेरकांचा ताण मोठ्या प्रमाणात कमी करते, ज्यामुळे रात्री चांगली झोप येण्यास मदत होते.
शरीराला डिटॉक्स करण्यासाठी देखील फायदेशीर
काळ्या मिठात मिनरल्सचे प्रमाण जास्त असल्याने ते अँटीबॅक्टेरियल म्हणूनही काम करते. यामुळे शरीरातील धोकादायक बॅक्टेरिया नष्ट होतात.
(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)