आयुष्यात सर्व काही मिळवूनही जर मन आनंदी नसेल तर सगळं व्यर्थ असल्याचं म्हटलं जातं. कारण माणूस आयुष्यभर सुखी आणि आनंदी जीवनासाठीच सर्व कष्ट आणि प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपण आयुष्यात आनंदी राहणं किती महत्वाचं आहे हे तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. शिवाय आनंदी राहिल्याने शरीर आणि मनही निरोगी राहतं. असं असूनही अनेकजण सतत चिंतेत असतात शिवाय ते आनंदी राहण्यासाठीचा मार्ग शोधत असतात. आज अशाच अशांत आणि असमाधानी लोकांना आनंदी राहण्याबाबतच्या काही टीप्स सांगणार आहोत.
तुम्ही तुमच्या मेंदूला सर्व सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रशिक्षण देऊ शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनातील चांगल्या गोष्टी शोधा आणि प्रत्येक गोष्टीतील चूक पाहू नका. तसंच भविष्याबद्दल शक्य तितके आशावादी रहा. हे शेवटी तुम्हाला नक्कीच आनंदी आणि निरोगी बनवू शकतात यात शंका नाही. जीवनात आशावादी दृष्टीकोन बाळगणे आणि आनंदी राहिल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास, स्ट्रोकचा धोका कमी करण्यास, झोप येण्यास, स्मरणशक्ती वाढवण्यास आणि एकंदरीतच निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. आनंदी स्वभावामुळे समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनाला चालना मिळते, ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रेरणा वाढते, समविचारी लोकांशी संपर्क साधण्यात मदत होते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासही मदत होते.
हेही वाचा- खराब कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने कमी करतात ‘या’ ८ पालेभाज्या? बाजारातही सहज उपलब्ध होतील
असे रहा आनंदी –
तुमच्यातील शक्ती –
आनंदी राहण्यासाठी सर्वात पहिल्यांदा स्वत:च्या शक्ती आणि सामर्थ्यांना ओळखा. तुम्ही तुमची सामर्थ्य आणि तुमच्यातील टॅलेंट ओळखलं तर तुम्ही एखादं ध्येय निश्चित करु शकताआणि त्यात सहज यशस्वी बनू शकता.
कौतुक करा –
इतरांच्या कलागुणांचे कौतुक करा, इतरांना चांगल म्हटल्यामुळे कौतुक केल्यामुळे त्यांना बरं वाटतेच शिवाय आपणालाही आनंद मिळतो. तुमच्या आयुष्यातील अशा लोकांना शोधा ज्यांनी तुम्हाला मदत केली आहे आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा असा सल्ला तज्ञ देतात.
रोजनिशी लिहा –
हेही वाचा- मोबाईल वापरण्याची पद्धत सांगू शकते तुमचं व्यक्तिमत्त्व? कसं ते जाणून घ्या
लक्ष केंद्रित करण्याचा आणि भावनिकपणा वाढवण्याचा मार्ग शोधण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
सकारात्मक विचार-
सकारात्मक असणे ही मानसशास्त्राच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या मनाला आनंदी ठेवण्यासह आयुष्यातील इनेक समस्या सोडवण्यासाठी कामावर किंवा घरातील लोकांमध्ये आत्मविश्वासाने वावरण्यासाठी फायदेशीर ठरते.
दयाळूपणा –
आपण लहान असताना रागीट नव्हे तर दयाळू आणि आपणाला मदत करणारी लोकं आवडायची. काही असे लोक असतात जे ओळख नसतानाही अनेकांना मदत करतात काहीतरी देणगी देतात त्यांच्या या कृतीतून ते दयाळू असल्याचं जाणवतं. दयाळूपणा आनंद आणि सकारात्मकतेला बळकटी देतो आणि दयाळू राहणे तुम्हाला निरोगीगी बनवू शकते.
हेही वाचा- ‘या’ पद्धतीने पाणी प्यायल्याने वाढतो डायबिटीज व कॅन्सरचा धोका? तज्ञांनी दिले स्पष्ट उत्तर
ध्येय निश्चित करा –
जीवनात आपल्यासाठी काय महत्वाचं आहे आणि जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्यासाठी आपण काय करू शकतो? हे समजून घेण्यासाठी आपलं ध्येय निश्चित असणं गरजेच आहे. ध्येय निश्चितीमुळे अधिक आनंदी आणि समाधानी वाटण्याची शक्यता असते.
सकारात्मकतेवर विश्वास –
तुमचे डोळे बंद करा आणि एका सुंदर दिवसाची कल्पना करा. तुम्हाला कुठे रहायचे आहे, कोणासोबत, तुम्हाला काय करायचे आहे याचा विचार करा आणि मग ते करण्याची कल्पना करा, असे तज्ञ म्हणतात. या सकारात्मक दृष्टीकाणामुळे तुम्ही आनंदी राहू शकता.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता)