भारतातील कोणत्याही नागरिकाला स्वतःची ओळख पटवण्यासाठी आधार क्रमांक हा एक महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे. १२ अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर केंद्र सरकारकडून भारतीय नागरिकांना जारी केला जातो. ज्यात त्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, फोटो सोबत त्याची बायोमेट्रिक माहिती सुद्धा आहे. जर तुम्हाला आधार कार्डवरचा फोटो आवडत नसेल तर तुम्ही तो बदलू शकता. भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) ला आधार क्रमांक जारी करणे आणि व्यवस्थापित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

UIDAI नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, ई-मेल पत्ता आणि फोटो बदलण्यासाठी फक्त ऑफलाइन सुविधा पुरवते. हे ऑनलाइन आणि पोस्ट द्वारे केले जाऊ शकत नाही. सोप्या शब्दात, एखादी व्यक्ती नावनोंदणी केंद्रावर जात असेल तेव्हाच फोटो अपडेट करता येईल. फोटोमध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या नावनोंदणी केंद्रात जावे लागेल किंवा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे काम देखील करू शकता.

Swara bhaskar photo with Sajjad Nomani Troll
Swara Bhaskar: ‘व्होट जिहाद’चा उल्लेख केलेल्या सज्जाद नोमानींसह स्वरा भास्करचा फोटो पाहून नेटिझन्सनी उडवली खिल्ली
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
shani rash parivartan 2025 shani guru transit change luck of these zodiac
Shani Rashi Parivartan 2025: नववर्षात शनि-गुरु बदलणार चाल, ‘या’ राशीच्या लोकांच्या नशिबाचे दार उघडणार, नोकरीसह मिळणार पैसाच पैसा
Supreme Court On NCP :
Supreme Court : “स्वत:च्या पायावर उभे राहा”, शरद पवारांचे फोटो न वापरण्याची अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाची ताकीद
Sun Planet Transit In Scorpio
५ दिवसांनंतर सुर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश, या राशींचे सुरु होणार चांगले दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश!
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?
Batoge To Katoge wedding card viral
हद्दच झाली! लग्नाच्या पत्रिकेवरही आता ‘बटोगे तो कटोगे’चा नारा; व्हायरल होणाऱ्या लग्नपत्रिकेत मोदी-योगींचा फोटो

आधार कार्डमधील फोटो बदलण्याची ही आहे प्रक्रिया

प्रथम तुम्हाला UIDAI वेबसाइट uidai.gov.in वर लॉग इन करावे लागेल आणि आधार नोंदणी फॉर्म डाउनलोड करावा लागेल.

हा आधार नावनोंदणी फॉर्म भरा आणि जवळच्या आधार नावनोंदणी केंद्रावर जमा करा.

आता कर्मचारी तुमचा बायोमेट्रिक तपशील आधार नोंदणी केंद्रात घेतील.

नंतर आधार नावनोंदणी केंद्राचा कर्मचारी तुमचा फोटो घेतील.

आधार नावनोंदणी केंद्राचा कर्मचारी तुमच्या आधार कार्डमधील फोटो २५ रूपये+जीएसटी अशी फी आकारून अपडेट करेल.

आधार नावनोंदणी केंद्राचा कर्मचारी तुम्हाला यूआरएन सोबत एक स्लिप देखील देतील.

तुम्ही तुमचा आधार कार्ड फोटो बदलला आहे की नाही हे तपासण्यासाठी हे यूआरएन वापरू शकता.

आधार कार्ड फोटो अपडेट केल्यानंतर, नवीन फोटोसह अद्ययावत आधार कार्ड यूआयडीएआयच्या वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल.