सध्याच्या काळात अगदी सीमकार्ड, रेशनकार्डपासून ते जवळपास प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी आधारकार्ड ही अनिवार्य गोष्ट आहे. भारताच्या रहिवाशांना योग्य प्रकारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक १२ अंकी क्रमांक दिला जाते त्याला आधार क्रमांक म्हणतात.आधारकार्ड आता लहानग्यासाठी अनिवार्य आहे. ५ वर्षाखालील मुलांकडे आधारकार्ड असावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या मुलांना बाल आधारकार्ड दिलं जातं. मुलांच्या आधार कार्डला ‘बाल आधार कार्ड’ असे नाव दिले आहे आणि त्याचा रंग निळा आहे. याचा उपयोग शाळेत दाखला घेण्यापासून बँकेत खातं उघडण्यासाठी होतो. आता आधार कार्ड बनवणारी संस्था UIDAI ने देशात एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. ज्यामध्ये नवजात बाळाच्या जन्मासोबतच हॉस्पिटलमध्ये आधार नोंदणी करण्याची तयारी आहे. UIDAI आणि रुग्णालयांनीही यासाठी तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत नवजात बालकाचं आधार तयार करत नव्हते. कारण वयानुसार बायोमेट्रिक बदल होत असतात. मात्र आता नवजात बालकाला जन्मासोबतच आधार नोंदणीही मिळणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा