…हे वापरून पाहा!, …हे घेऊन बघा!, तुमचा रंग उजळवा!, पांढऱ्या शुभ्र दातांसाठी…! अशाप्रकारची वाक्ये आपल्याला जाहिरातविश्वात अनेकवेळा कानावर पडतात आणि जोतो आपले उत्पादन कसे श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी नवीन नवीन कल्पना साकारत आहे याची अनुभूती मिळते. आजच्या स्पर्धेच्या युगात उत्पादनाच्या विक्रीचा उच्चांक गाठायचा असेल तर जाहिरातीशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच वृत्तपत्र, दूरचित्रवाणी, चित्रपटगृह अगदी अलिकडील संकेतस्थळांचे महाजालदेखील जाहिरातींनी व्यापलेले आहे. आपली जाहिरात इतर उत्पादनाच्या जाहिरातीपेक्षा अनोखी दिसावी अशी प्रत्येक उत्पादनकर्त्याची इच्छा असते. या कामासाठी जाहिरातकर्त्याला पाचारण केले जाते. जाहिराती तयार करणाऱ्या या कंपन्यांचे आणि तेथील कर्मचाऱ्यांचे विश्व हे अनोखे असते. कल्पनाशक्ती पणाला लावणारे, सतत काही तरी नवीन साकारण्याची उर्मी उरी बाळगणारे आणि ऊर्जेने भरलेले अनेकजण येथे पाहायला मिळतात. त्यांच्या कार्यक्षेत्राचा परिणाम त्यांच्या राहणीमानातदेखील डोकावत असतो. तर अशा या कार्यप्रेरितांच्या अविष्काराचे काही नमुने येथे वानगीदाखल दिले आहेत. कोणत्याही प्रकारचा गवगवा न करता ह्या जाहिराती उत्पादनाबाबत बरच काही सांगून जातात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा