Washing Machine Tips : हल्ली प्रत्येकाच्या घरात वॉशिंग मशीन पाहायला मिळते. पूर्वी ज्या ठिकाणी हाताने कपडे धुण्यासाठी तासन् तास लागत होते, तेथे आता मशीनमुळे काही मिनिटांत सहज कपडे धुऊन लवकर सुकवता येतात. ज्यांच्या घरी वॉशिंग मशीन आहे, त्यांना आता हाताने कपडे धुणे अवघड जाते. काही लोक आठवडाभराचे कपडे एकदाच वॉशिंग मशीनमध्ये टाकून धुतात. पण, अशा प्रकारे वॉशिंग मशीन ओव्हरलोड करून कपडे धुणे घातक ठरू शकते. जाणून घेऊ कसे ते?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकदा आपल्याला वाटते की, वॉशिंग मशीन लावली आहे, तर जमलेले सर्व कपडे एकदाच धुऊन टाकले पाहिजेत. पण, पाणी, डिटर्जंट आणि वीज वाचवण्यासाठी वॉशिंग मशीन कपड्यांनी ओव्हरलोड करण्यामुळे होणारा धोका आणि नुकसान लोकांना माहीत नाही.

प्रत्येक वॉशिंग मशीनची एक ठरावीक क्षमता असते; जी किलोमध्ये मोजली जाते. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की, काही वॉशिंग मशिन्स सहा किलोग्रॅमच्या, तर काही सात किलो, ८ किलो किंवा १० किलोच्या असतात. घरच्या गरजा आणि लोकांची संख्या पाहून किती क्षमतेची वॉशिंग मशीन खरेदी करायची हे ठरवले जाते.

पण, वॉशिंग मशीनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कपडे भरू नयेत. याचा अर्थ कपडे मशीनमध्ये ओव्हरलोड न होता धुण्यासाठी टाकले पाहिजेत.

वॉशिंग मशीनमध्ये कपडे ओव्हरलोड झाल्यास अनेक समस्या उदभवू शकतात. जर तुम्ही मशीनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कपडे लोड केलेत, तर वॉशिंग मशीनची कार्यक्षमता बिघडू शकते आणि तिचे आयुष्यही कमी होऊ शकते. याशिवाय ओव्हरलोडिंगमुळे कपड्यांमधून साबण नीट बाहेर निघत नाही आणि ते नीट साफही होत नाहीत.

ओव्हरलोड वॉशिंग मशीन धोक्यापेक्षा कमी नाही. त्यामुळे स्पिन सायकलमध्ये समस्या येऊ शकतात. स्पिन सायकलचा कपडे सुकवण्यासाठी उपयोग होतो; पण त्यात खूप कपडे टाकले, तर ती नीट चालत नाही. त्यामुळे मशीन खराब होण्याचा धोका वाढतो. तेव्हा नेहमी वॉशिंग मशीनमध्ये तेवढेच कपडे घालावेत, जेवढे वॉशिंग मशीनमध्ये व्यवस्थित धुतले जाऊ शकतील.