Diabetes Diet and Yoga: भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या कारणास्तव भारताला जगाची मधुमेहाची राजधानी असेही संबोधले जात आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरात शुगर वाढण्याच्या आधी शरीर अनेक सिग्नल देते, पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नंतर वाढलेली शुगर कायमस्वरूपी मधुमेहाचे रूप घेते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मधुमेह होण्यापूर्वी शरीर कोणते संकेत देते? Diabetes Symptoms

प्रसिद्ध योगगुरू स्वामी रामदेव म्हणतात की रक्तातील साखरेची पातळी वाढल्यावर शरीर अनेक संकेत देते, पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. उदाहरणार्थ, शरीरावर पुरळ किंवा काळे डाग दिसणे, जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे, वजन झपाट्याने कमी होणे, शरीरात अशक्तपणा येणे आणि चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधार येणे, ही लक्षणे जेव्हा दिसू लागतात तेवग समजावे की तुमच्या शरीरात शुगर वाढली आहे.

बाबा रामदेव म्हणतात की , साखरेची लक्षणे दिसू लागताच आपण वेळीच सतर्क झालो तर हा आजार टाळता येऊ शकतो. प्री-डायबिटीससोबतच, मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज किमान १० मिनिटे योगासने आणि प्राणायाम करणे आवश्यक आहे.

मधुमेहासाठी योग

  • मंडूक आसन
  • योग मुद्रासन
  • शीर्षासन
  • सर्वांगासन
  • प्राणायाम

( हे ही वाचा: किडनी निकामी होण्यास कारण ठरेल रक्तातील खराब युरिक ॲसिड; ‘या’ ५ उपायांनी वेळीच करा कंट्रोल)

आयुर्वेद अन्नाबद्दल काय सांगतो? Diabetes Diet according to Ayurveda

आयुर्वेदातील तज्ज्ञ आणि पतंजली योगपीठाशी जोडलेले आचार्य बाळकृष्ण सांगतात की, शुगरच्या रुग्णांनी योग-प्राणायामासोबतच आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. ते म्हणतात की जर तुमची साखर सतत वाढत असेल तर काकडी, टोमॅटो, कारले आणि गिलॉय ज्यूस प्या. साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. याशिवाय मेथीचे पाणी, अंकुरलेली मेथी देखील खूप फायदेशीर आहे.

त्याचवेळी बाबा रामदेव सांगतात की साखरेच्या रुग्णांनी रोज सकाळी एक चमचा मेथी पावडर खावी, लसूणच्या दोन पाकळ्या खाव्यात. तसेच कोबी, कारले आणि पडवळीचा आहारात समावेश करा. हे खूप फायदेशीर आहे.

मधुमेहाशी संबंधित १० तासांचा नियम काय आहे?

रक्तातील साखरेच्या रुग्णांनी जेवणाची विशेष काळजी घ्यावी. तुम्ही काय खात आहात, हे महत्त्वाचे आहे. तसेच, जेवताना काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. खाण्याच्या अनियमिततेमुळे तुमची hba1c पातळी वाढू शकते. नेदरलँडमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, जर तुम्ही तुमचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण १० तासांच्या कालावधीत केले तर इतर लोकांच्या तुलनेत साखर नियंत्रणात राहते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to ayueveda body gives 5 signals when blood sugar increases know 10 hour rule for diabetes gps