तूपाचा वापर प्रत्येक घरात केला जातो. तुपाने जशी जेवणाची चव वाढते तसंच याच्या सेवनाने आरोग्याला देखील फायदा होतो. रोज तूप खाल्ल्याने लठ्ठपणावर नियंत्रण ठेवता येते. याच्या सेवनाने हाडे आणि स्नायू मजबूत होतात. तेलाऐवजी तूप खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. व्हिटॅमिन ई युक्त तुपाचे सेवन त्वचेसोबतच आरोग्याचीही काळजी घेते. अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की व्हिटॅमिन ई समृध्द तुपात महत्वाचे अँटिऑक्सिडेंट असतात जे कर्करोग, संधिवात आणि मोतीबिंदूचा धोका कमी करण्यास मदत करतात.
आचार्य बाळकृष्ण यांच्या मते आयुर्वेदात तूप हे औषध मानले जाते. कोणत्याही ऋतूत तुपाचे सेवन फायदेशीर ठरते. त्यात ओमेगा-३, ओमेगा-९ फॅटी अॅसिड आणि जीवनसत्त्वे ए, के, ई असे अनेक पोषक घटक असतात, ज्याचा आरोग्याला फायदा होतो. तज्ज्ञांच्या मते, आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या तुपाचे सेवन केल्याने काही लोकांच्या आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. जाणून घेऊया कोणासाठी तुपाचे सेवन विषासारखे काम करते.
( हे ही वाचा: Multi-cancer Early Detection Tests: आता फक्त एका टेस्टने करता येईल सर्व प्रकारच्या कॅन्सरची तपासणी; जाणून घ्या कसे)
पचन व्यवस्थित होत नसेल तर तुपाचे सेवन टाळा
ज्यांची पचनशक्ती चांगली नसते, त्यांनी तूप खाणे टाळावे. गॅस, अॅसिडिटी आणि अपचनाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी जर तुपाचे सेवन केले तर त्यांच्या समस्या वाढतात. जर तुमची पचनशक्ती चांगली नसेल तर तुम्ही मर्यादित प्रमाणात तुपाचे सेवन केले पाहिजे.
यकृताचा आजार असल्यास तुपापासून दूर राहा
ज्या लोकांना यकृताची समस्या आहे त्यांच्यासाठी तुपाचे सेवन विषासारखे काम करते. यकृताच्या आजारात यकृत खराब होऊन त्याची काम करण्याची क्षमता कमी होते. यकृत अन्न पचण्यास मदत करते, यकृत खराब होऊ लागले तर तूप पचण्यास अडथळा निर्माण होतो आणि यकृताला अधिक नुकसान होते. लिव्हर सिरोसिस, स्प्लेनोमेगाली, हिपॅटोमेगाली, हिपॅटायटीसच्या रुग्णांनी तूप खाणे टाळावे.
( हे ही वाचा: चुकीच्या पद्धतीने उपवास करणे आरोग्यास ठरू शकते हानिकारक; आयुर्वेदात याबाबत सांगितलेली योग्य पद्धत नक्की जाणून घ्या)
तूप गरोदरपणात समस्या वाढवू शकते
गरोदरपणात गर्भवती महिलेचे वजन झपाट्याने वाढते, अशा स्थितीत तुपाचे सेवन आरोग्यास हानी पोहोचवू शकते. तूप खाल्ल्याने महिलांचे वजन वाढेल आणि गरोदरपणात लठ्ठपणासह अनेक आजारांचा धोकाही वाढेल. महिलांनी गरोदरपणात तूप खाणे टाळावे.
‘या’ गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे
- पोटासंबंधित कोणतीही समस्या असल्यास तूप खाणे टाळावे.
- फॅटी ऍसिडस् युक्त तुपाचे सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो, त्यामुळे त्याचे सेवन टाळा.