Chanakya Niti For Money : जीवनात अपार धन-संपत्ती मिळवणे हे प्रत्येक जणांचं स्वप्न असतं. त्याला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासू नये आणि तो आपलं जीवन सुख-सुविधांनी जगू शकेल, यासाठी नेहमी धडपड करत असतो. काही लोक त्यांच्या जीवनात सर्व सुखसोयी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करतात. मात्र, आचार्य चाणक्य यांच्या मते, देवी लक्ष्मी कोणत्याही व्यक्तीच्या घरात येत नाही. आचार्य चाणक्य, ज्यांना कौटिल्य म्हणून ओळखलं जातं, त्यांनी एक नीतिशास्त्र रचलं होतं. यात त्यांनी समाजाला योग्य जीवन जगण्याचा सल्ला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात पैसा, स्त्रिया, वैवाहिक जीवन यासह जवळजवळ प्रत्येक विषयावर काही सल्ला आणि सूचना दिल्या आहेत. कौटिल्य या नावाने प्रसिद्ध असलेल्या चाणक्याने आपल्या नीतिशास्त्रात अशा पाच लोकांचा उल्लेख केला आहे, ज्यांच्याकडे देवी लक्ष्मी कधीही टिकत नाही.

कटू बोलणारे : आचार्य चाणक्य यांच्या मते कटू बोलणाऱ्यांकडे पैसा कधीच टिकत नाही. ज्योतिषशास्त्रात धनाची देवी लक्ष्मी चंचल असल्याचं सांगितलं आहे. म्हणजेच देवी लक्ष्मी अतिशय चंचल स्वभावाची आहे, ती एका जागी राहण्यास असमर्थ आहे. अशा वेळी कडू बोलणाऱ्यांवर देवी लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही.

अति खाणारे : जे लोक आपल्या गरजेपेक्षा जास्त खातात आणि इतरांच्या हक्काचं देखील खातात, त्यांच्याकडे नेहमी पैशाची कमतरता असते.

घाणेरडे कपडे परिधान करणारा : आचार्य चाणक्य यांच्यानुसार जो व्यक्ती स्वच्छतेची काळजी घेत नाही आणि घाणेरडे कपडे घालतो, त्यावरही देवी लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही.

आणखी वाचा : ज्योतिष शास्त्रानुसार, २०२२ मध्ये ‘या’ ३ राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकेल, धन-धान्यात वाढ होईल

आळशी: आचार्य चाणक्य जी मानतात की, आळशी लोक कधीही श्रीमंत होऊ शकत नाहीत. कारण असे लोक त्यांच्या आळशीपणामुळे कोणतेही काम वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत. मात्र, नंतरच्या आयुष्यात या लोकांना खूप पश्चातापही होतो.

आणखी वाचा : Vivah Panchami 2021: ‘या’ दिवशी लग्न करणारे लोक खूप दुःखी जीवन जगतात, याचे खास कारण पुराणात सांगितले आहे

ज्यांची दिनचर्या अनियमित असते: चाणक्यांच्या मते, लोक सूर्योदयानंतर झोपतात, त्यांच्यावर देवी लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. धनाची देवी अशा लोकांसोबत कधीच सोबत राहत नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to chanakya niti maa lakshami will never stay with 5 types of people chanakya neeti prp