अनेकदा लोकं विचार न करता जमीन खरेदी करतात आणि त्यावर घर बांधतात, त्यामुळे त्यांना आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याचे कारण वास्तुदोष असू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी वास्तुशास्त्राची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जमीन खरेदी करताना वास्तूचे नियम पाळल्यास घरातील वातावरण सकारात्मक उर्जेने भरलेले राहते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यामुळे घर बांधण्यासाठी जमीन घ्यायची असेल तर वास्तुशास्त्राची विशेष काळजी घ्या. असे केल्याने तुमच्या घरात नेहमी सुख-समृद्धी राहील.

दिशा सांभाळा

वास्तुशास्त्रात १० दिशा आहेत. जर जमिनीचा पुढचा भाग म्हणजेच मुख्य दरवाजा उत्तरेकडून पूर्व दिशेला असेल तर ते खूप शुभ मानले जाते. याशिवाय जमीन उत्तर-पूर्व दिशेला म्हणजेच ईशान्य दिशेला जास्त असेल तर अशी जमीन शुभ मानली जाते. याशिवाय जमीन खरेदीसाठी दक्षिण-पश्चिम दिशाही चांगली असल्याचे सांगितले जाते.

जागेच्यासमोर कोणतेही मोठे बांधकाम नसावे

वास्तुशास्त्रानुसार जमिनीसमोर कोणतेही मोठे बांधकाम नसावे. कारण मोठ्या घराची किंवा इमारतीची सावली जमिनीवर पडणे शुभ मानले जात नाही. याशिवाय घरासमोर कोणतेही मोठे झाड नसावे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही दक्षिण दिशेने रोपे लावू शकता.

जमीन खरेदी करण्यापूर्वी हे उपाय करा

तुम्ही जमीन खरेदी करण्यापूर्वी, त्यात एक खड्डा खणून घ्या आणि नंतर ते पाण्याने भरा. दुसऱ्या दिवशी जाऊन खड्डा बघा, त्यातील पाणी पूर्ण आटले असेल तर अशी जमीन घेणे टाळावे. दुसरीकडे, खड्ड्यात पाणी शिल्लक असेल तर ते ताबडतोब खरेदी करा. कारण अशी जमीन चांगली मानली जाते.

जमिनीचे कोपरे कापले जाऊ नयेत

वास्तुशास्त्रानुसार जी जमीन तुम्ही खरेदी करत आहात, तिचे कोपरे कापले जाऊ नयेत याकडे लक्ष द्या. तसेच, भूखंडाभोवती पाणथळ जमीन नसावी.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to vastu shastra always remember these things before buying any plot vastu tips scsm