वास्तुशास्त्रानुसार, घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. बरेचदा असे घडते की कठोर परिश्रम करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत किंवा कोणतेही काम करता येत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार याचे कारण वास्तुदोष असू शकतो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट लावल्याने आर्थिक स्थितीवर सकारात्मक परिणाम होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र, घरात मनी प्लँट लावताना त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कारण वास्तुनुसार मनी प्लांटची काळजी न घेतल्यास तुमच्या आयुष्यात तणाव आणि आर्थिक संकट येऊ शकते. मनी प्लांट लावताना दिशेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण जर तुम्ही मनी प्लांट योग्य दिशेने लावला नाही तर तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात.

या दिशेला मनी प्लांट लावा

मनी प्लांट नेहमी घराच्या आग्नेय कोपऱ्यात ठेवावा. यामुळे घरात सुख-समृद्धी वाढते, तसेच नकारात्मक ऊर्जा दूर होते. दुसरीकडे ईशान्येला मनी प्लांट लावल्याने घरात तणाव वाढतो.

पाणी द्या

मनी प्लांट प्लांटला दररोज पाणी द्यावे. कारण जर मनी प्लांट सुकला तर घरात अशुभ स्थिती येते. त्याच वेळी, रोपाला कधीही जमिनीला स्पर्श करू देऊ नका. कारण त्याचे नकारात्मक परिणाम होतात.

प्रवेशद्वार

मनी प्लांट नेहमी घराच्या प्रवेशद्वारावर ठेवावा. असे केल्याने उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होतात आणि करिअरमध्येही नवीन संधी उपलब्ध होतात. तसेच हेही लक्षात ठेवा की मनी प्लांट कधीही निळ्या भांड्यात लावू नका.

पानांचा आकार

मनी प्लांट्स खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवा की ते हृदयाच्या आकाराचे असावेत. कारण अशा पानांचा मनी प्लांट खरेदी केल्याने घरात धन-समृद्धी वाढते.

एक मोठे भांडे वापरा

घरामध्ये मनी प्लांट ठेवण्यासाठी नेहमी मोठ्या भांड्याचा वापर करावा. कारण मनी प्लांटमध्ये जितकी हिरवळ जास्त तितकी आर्थिक स्थिती चांगली.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to vastu shastra planting money plant in the house comes economic progress vastu tips scsm