Vastu Tips For Home: वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. असे मानले जाते की या उपायांचा अवलंब केल्याने कुटुंबातील लोकांची प्रगती होते आणि त्यांच्यामध्ये प्रेम टिकून राहते. वास्तूनुसार, गणेशजींच्या दोन मूर्ती घराच्या मुख्य दरवाजाच्या आत आणि बाहेर अशा प्रकारे ठेवाव्यात की त्या मूर्तींची पाठ एकमेकांना चिकटलेली असेल. असे केल्याने कुटुंबातील सर्व अडथळे दूर होतात असा विश्वास आहे.
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ईशान्य दिशेला तुळशीचे रोप ठेवा. त्याला रोज पाणी अर्पण करा आणि संध्याकाळी त्याच्यासमोर दिवा लावा. यानंतर “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा ११ वेळा जप करा. असे केल्याने धन आणि अन्नधान्य वाढते असे मानले जाते.
( हे ही वाचा: Surya Grahan 2021: ‘या’ दिवशी लागणार सूर्यग्रहण; जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांवर पडणार प्रभाव )
वास्तूनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोरण ठेवणे खूप शुभ मानले जाते. हे तोरण आंबा, अशोक किंवा पिंपळाच्या पानांचे असावे. असे मानले जाते की तोरण लावल्याने घरात सुख-समृद्धी येते.
( हे ही वाचा: ‘या’ चार राशीचे लोक असतात खूप निडर; कोणताही धोका पत्करण्यात मागे हटत नाहीत )
घराच्या मुख्य गेटवर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावणे देखील शुभ मानले जाते. सकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढावी. हे रोज करणे शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा हे काम करा. असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे मानले जाते.
( हे ही वाचा: चपाती मऊ आणि छान फुलत नाही? मग ट्राय करा ‘या’ टिप्स )
दररोज स्नान केल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह काढावे. असे मानले जाते की असे केल्याने आर्थिक विवंचना दूर होतात आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते.