श्रीमंत होणे कोणाला नको असतं…? आपल्याकडे भरपूर पैसा असावा, सर्व सुखसोयींनी युक्त घर असावं…आयुष्यात कधीच कुठलंही काम पैश्यामुळे नको अडायला असं प्रत्येकालाच वाटत असतं. कारण आजच्या काळात पैश्याशिवाय माणसाच्या आयुष्यातलं पान सुद्धा हलत नाही, हे कडू वाटत असलं तरी सत्य परिस्थिती आहे. महान मुत्सद्दी आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्र तयार केलं आहे. यात त्यांनी मानव कल्याणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्यांची धोरणं खूप प्रभावशाली मानली जातात. कारण त्यांनी आपल्या धोरणांच्या बळावर नंद वंशाचा नाश केला आणि एका साध्या मुलाला चंद्रगुप्त मौर्याला मगधचा सम्राट बनवलं. असं मानलं जातं की जर एखाद्या व्यक्तीने आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन केले तर त्याला आयुष्यात कधीही अडचणींचा सामना करावा लागत नाही.
आचार्य चाणक्यजींनी पती-पत्नीचे नाते, मैत्री, धर्म, कर्म आणि पैसा यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी आपल्या नीतिशास्त्रात नमूद केल्या आहेत. आचार्य चाणक्य सांगतात की, जर एखाद्या व्यक्तीला श्रीमंत व्हायचं असेल तर त्याने नेहमी या ५ गोष्टींची काळजी घ्यावी. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी-
धनसंचय: आचार्य चाणक्यजी मानतात की, माणूस कितीही श्रीमंत झाला तरी त्याने नेहमी संपत्ती जमा केली पाहिजे. कारण हा जमा केलेला पैसा वाईट काळात माणसाला उपयोगी पडतो. चाणक्यजी मानतात की वाईट काळ आणि आजार माणसाच्या आयुष्यात कधीही दार ठोठावू शकतात.
अशा ठिकाणी राहा: चाणक्य जी मानतात की माणसाने नेहमी अशा ठिकाणी राहावे, जिथे सतत प्रगती होत असते, शिक्षण आणि औषधाची योग्य व्यवस्था असते, तसेच ज्या क्षेत्रात सन्माननीय लोक राहतात. कारण अशा ठिकाणी राहिल्याने माणूस लवकर अडचणीत येत नाही.
पैशाचा लोभ : आचार्य चाणक्य सांगतात की, जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात श्रीमंत व्हायचं असेल तर त्याने कधीही पैशाचा लोभी होऊ नये. कारण अनेक वेळा त्याचा हा लोभ त्याला चुकीच्या गोष्टी करायला प्रवृत्त करतो.
दान-पुण्य: आचार्य चाणक्यजी सांगतात की, माणसाने नेहमी दान करत राहावे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या उत्पन्नातील काही भाग गरीब आणि गरजूंना दान करू शकता. यामुळे देव प्रसन्न होतो.
ध्येय निश्चित करा: चाणक्यजी सांगतात की ध्येयहीन व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यात काहीतरी ध्येय निश्चित करा.