महान अर्थतज्ज्ञ आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्राची रचना केली आहे. यात संपत्ती, मालमत्ता, महिला, मित्र, करिअर आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचे सखोल वर्णन केले आहे. चाणक्य यांनी नेहमीच आपल्या धोरणांनी समाजाला मार्गदर्शन केले आहे. असे मानले जाते की जो व्यक्ती आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करतो तो जीवनात मोठी प्रगती करतो. आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने जीवनात तीन प्रकारच्या लोकांना कधीही मदत करू नये. कारण यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला तर हानी पोहोचतेच, पण तुम्ही अडचणीतही येऊ शकता. ज्याचा या श्लोकात उल्लेख आहे.

मूर्खाशिष्योपदेशेन दुष्टास्त्रीभरणेन च,
दु:खिते सम्प्रयोगेण पंडितोऽप्यवसीदति।

Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
homosexual, Akola , Marriage for money,
अकोला : पैशांसाठी लग्न, पोलीस पत्नीचा छळ अन् पती निघाला समलैंगिक….
Loksatta tatva vivek Popularization of Western philosophy
तत्व विवेक: पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचं लोकाभिमुखीकरण
Couples who are ineligible for marriage due to age restrictions are eligible to live-in
वयाच्या अटीमुळे लग्नास अपात्र जोडपे लिव्ह-इन करता पात्र!
Empowering tribal farmers through organic farming
आदिवासी महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी…

मूर्ख व्यक्तीपासून दूर राहा: या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य सांगतात की, माणसाने नेहमी मुर्खांपासून दूर राहावे. कारण अशा लोकांना ज्ञान देणं म्हणजे गाढवासमोर गीता वाचण्यासारखे आहे. मूर्खाच्या कल्याणाचा विचार केला तरी तो निरर्थक युक्तिवाद करेल. मूर्ख व्यक्तीला ज्ञान देणे म्हणजे वेळ आणि शक्ती वाया घालवणे मानले जाते. कारण मूर्खाला मेंदू नसतो आणि तुम्ही जे बोलता ते या कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो. तसेच तो स्वतःचे खरं करेल. म्हणूनच मूर्ख माणसाला कधीही सल्ला देऊ नये.

वाईट चारित्र्य असलेली व्यक्ती: आचार्य चाणक्य लोकांना वाईट चारित्र्याच्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. जर तुम्ही चारित्र्यहीन व्यक्तीसोबत वेळ घालवला तर तुमची प्रतिमाही डागाळू शकते. त्याचबरोबर समाजातील लोकही तुमच्याकडे त्याच नजरेने बघू लागतात, मग तुमचे चारित्र्य कितीही स्वच्छ असले तरी. म्हणूनच चाणक्य नेहमी वाईट चारित्र्याच्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा सल्ला देतात.

Chanakya Niti: ‘हे’ गुण असलेली स्त्री तिच्या पतीसाठी मानली जाते भाग्यवान

विनाकारण दुःखी असलेला व्यक्ती: चाणक्य यांच्या मते जो व्यक्ती विनाकारण दुःखी असतो, तो नेहमी इतरांच्या प्रगतीचा हेवा करत असतो. अशा लोकांमध्ये मत्सराची भावना असते. अशी व्यक्ती सर्वांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करते. तुम्ही काही लोक पाहिले असतील की ते श्रीमंत आहेत आणि सक्षम देखील आहेत. पण तरीही त्यांना रडायची सवय आहे. म्हणून, चाणक्य विनाकारण दुःखी असलेल्या व्यक्तीपासून नेहमी अंतर ठेवण्याचा सल्ला देतात. चाणक्य म्हणतात की अशा लोकांना नेहमी इतरांचा फायदा कसा घ्यायचा हे माहित असते आणि ते काम संपल्यानंतर तुम्हाला सोडून जातात.

Story img Loader