शीतपेय, शर्करायुक्त पदार्थ आणि इतर आम्लयुक्त खाद्य पदार्थांमुळे तोंडात होणारी अॅसिडिटी दातांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे दात मुळापासून कमकुवत होऊ शकतात.
दातांच्या आरोग्याशी निगडीत उत्पादने बनविणाऱया एका कंपनीने सादर केलेल्या अहवालानुसार, अॅसिडिटी फक्त पोटातच होते असे नाही. तर त्याची सुरवात ही तोंडापासून होते आणि या कारणामुळे दात कमकुवत होत जातात. अगदी निरोगी आहारसुद्धा तोंडातील अॅसिडिटीचे कारण बनू शकते.
शर्करायुक्त पदार्थ, शीतपेये तोंडातील अॅसिडिटी वाढविण्याचे काम करतात.
उपाय-
भरपूर पाणी प्यावे, आहारात केळी असावीत, बटाटा आणि दुध यापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे तोंडातील अॅसिडिटी कमी होण्यास मदत होते.

Story img Loader