Sonam Kapoor News: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने यावर्षी २० ऑगस्ट रोजी पहिल्या मुलाला जन्म दिला. अभिनेत्री अनेकदा तिचा गरोदरपणाचा अनुभव लोकांसोबत शेअर करते. सोनमने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या प्रेग्नन्सीनंतरच्या अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. तिने आपल्या मुलाला जन्म देण्यासाठी ‘Gentle Birth Method’ची मदत कशी घेतली हे तिने इंस्टाग्रामवर सांगितले.
सोनम कपूरने लिहिले आहे की, तिला नैसर्गिकरित्या आपल्या मुलाला जन्म द्यायचा होता. अभिनेत्रीने सांगितले की डॉ गौरी मोथा यांनी तिला नैसर्गिक प्रसूतीसाठी खूप मदत केली. तिने ‘Gentle Birth Method’ नावाचे एक पुस्तकही लिहिले आहे ज्यामध्ये तिने मुलाच्या जन्मापूर्वी समस्यांना कसे सामोरे जावे हे सांगितले आहे. आता प्रश्न पडतो की ‘Gentle Birth Method’म्हणजे काय? ज्याच्या मदतीने सोनमची नैसर्गिक प्रसूती झाली आहे.
( हे ही वाचा: बदाम, काजू आणि पिस्ता किती प्रमाणात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या योग्य मात्रा)
Gentle Birth Method’ म्हणजे काय?
Gentle Birth Method’ हे डॉ. गौरी मोथा यांनी डिझाइन केलेले तंत्र आहे. या तंत्राचा वापर महिलांची गर्भधारणा आरामदायी, शांत आणि मुलाला जन्म देण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी केला जातो. हे तंत्र ब्रिटनमध्ये प्रदीर्घ काळापासून सुरू आहे, जे अलीकडे भारतातही सुरू झाले आहे. हा खरं तर एक वेलनेस प्रोग्राम आहे. डॉ. मन्नान गुप्ता, व्यवस्थापकीय संचालक आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, अॅलांटिस हेल्थकेअर, दिल्ली, यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की या प्रक्रियेमध्ये मन आणि शरीराची सकारात्मकता समाविष्ट असते.
‘Gentle Birth Method’ का वापरली जाते?
गर्भधारणेदरम्यान, आईला अधिक आत्मविश्वास, आरामशीर आणि शांत असणे खूप महत्वाचे आहे, ज्यासाठी Gentle Birth Method वापरली जाते. या प्रक्रियेत महिलेला १८ महिने शुगर फ्री आहार दिला जातो आणि अनेक प्रकारची योगासने केली जातात. या प्रक्रियेचा अवलंब केल्यास गर्भधारणा सुलभ होते.
( हे ही वाचा: मुंबईकरांच्या चिंतेत भर! शहरात अचानक पसरली गोवरची साथ, तीन बालकांचा मृत्यू, आजाराची लक्षणे आणि उपाय जाणून घ्या)
‘Gentle Birth Method’ मध्ये काय समाविष्ट आहे?
- डॉ. गुप्ता यांच्या मते,’Gentle Birth Method ‘मध्ये शरीर शांत ठेवण्यासाठी योग आणि ध्यान यांचा समावेश होतो.
- प्रसूतीच्या तारखेच्या ४ महिने आधीपासून स्त्रीच्या आहारात शुगर फ्री अन्न समाविष्ट केले जाते.
- यामध्ये स्त्रीच्या सकारात्मक डिलिव्हरी करण्याच्या कल्पनेवर भर दिला जातो.
- हिप्नोथेरपी केली जाते जेणेकरून आई सुरळीत आणि शांत प्रसूतीची कल्पना करू शकेल.